धरणगाव (प्रतिनिधी) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरोनामुक्त भारत अभियानास गती देण्यासाठी धरणगाव भाजपाच्यावतीने नुकतेच कोरोना लसीकरण शिबीर लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालय, धरणगाव येथे आयोजित करण्यात आले होते.
शिबीराचे उदघाटन विठोबा नामदेव महाजन (माळी समाज अध्यक्ष), नाना सजन पाटील (पाटील समाज अध्यक्ष), विलास पंढरीनाथ येवले, (वाणी समाज अध्यक्ष), भास्कर भगवान मराठे, (जेष्ठ समाजसेवक मराठे समाज), नितीन रघुनाथ चौधरी (तिळवण तेली समाज अध्यक्ष), सुनिल जावरे (भोई समाज अध्यक्ष), इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आलेल्या सर्व समाज अध्यक्षांचा सत्कार नगरसेवक ललित येवले मित्रपरीवाराच्यावतीने करण्यात आला. त्यानंतर सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करण्यात आले. व लसीकरणाला सुरुवात केली. सूत्रसंचालन व प्रास्ताविक चंद्रशेखर मुसळे यांनी केले.
शिबीरास भेट दिलेले प्रमुख मान्यवर
भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.व्ही.आर.तिवारी, डॉ.धीरजकुमार वाजपेयी, डॉ.किरण पाटील, डॉ.पंकज अमृतकर, डॉ.मनोज अमृतकर, सभापती प्रमोद पाटील, शिवसेना व्यापारी आघाडीचे दिनेश येवले व प्रशांत मुसळे, विनायक गुरव, समाधान मोरे, देवेंद्र अत्तरदे, विनोद शुक्ल, लाडशाखीय वाणी समाज उपाध्यक्ष, सचिव व संचालक मंडळ, समाज बांधव यांनी लसीकरण शिबिरास भेट दिली.
याप्रसंगी उपस्थित भाजप पदाधिकारी
भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, पुनीलाल अप्पा महाजन, भाजपा मिडिया तालुका प्रमुख टोनी महाजन, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल चौधरी, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, नगरसेवक शरद अण्णा कंखरे, गुलाब मराठे, कडुअप्पा बयास, भालचंद्र माळी, सुनिल चौधरी, कन्हैय्या रायपूरकर, श्रीराम महाजन, राजू महाजन, सुधाकर सांलुखे, अमोल महाजन, विशाल अमृतकर, विशाल महाजन, अमोल कासार, रवी पाटील, समाधान पाटील, सचिन पाटील, रितेश येवले, सागर चौधरी, योगेश येवले, पियुष बागड, अंकित येवले, प्रतीक बागड, रोहीत पितृभक्त, निलेश मेतकर, उमेश येवले इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. मयूर जैन व स्टॉपने सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नगरसेवक ललित येवले यांनी परिश्रम घेतले.