धरणगाव (प्रतिनिधी) नगरपालिकेच्या प्रभाग रचना तयार करीत असताना शासनाच्या कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, असा आरोप करत नगरसेवक पठाण अहमदखान महबुतखान यांनी हरकत घेतली आहे.
नगरसेवक पठाण अहमदखान महबुतखान यांनी हरकतीत म्हटले आहे की, धरणगाव नगर परिषदेची प्रभाग रचना तयार करीत असताना आपण वरील संदर्भात दिलेल्या माहिती आपण शासनाच्या कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, सदर प्रगणक गटाची गट निहाय कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही.
सन 2016 सार्वजनिक निवडणुकीचा नकाशा डोळ्यासमोर ठेवून आताचा नकाशा तयार करण्यात आला नाही. प्रभागांची सरासरी लोकसंख्या 10 टक्के दिशा – प्रभाग रचना सुरू करताना व कसे सुरुवात किंवा समाप्ती व कसे सरकावे व शेवट दक्षिणेत करावा तसेच भौगोलिक संलग्नता नाही.
प्रभागाच्या सीमारेषा हे दर्शवण्यात आलेली नाही. आदेशाच्या (4.7) महत्वाचे तत्व हे विचारात घेतलेले नाही. आदेशाच्या (4.8) नुसार प्रगणक गट फोडू नये म्हटले आहे तरी फोडण्यात आला आहे. सदर सर्व गोष्टींचा विचार केला असता प्रभाग रचना बनविताना शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तसेच याबत पुरावे व योग्य ते कागदपत्रे माझ्या कडे आहे. सदर माहिती मी सुनावणीच्या वेळेस सादर करेल, असेही हरकतीत म्हटले आहे
















