धरणगाव (प्रतिनिधी) येथील पिंप्री परिसरातील पतसंस्था यांची पंचवार्षिक निवडणूक हि बिनविरोध झाली. त्यात संस्थेचे संस्थापक रवींद्र मगन पाटील वाघळूद खु. यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली तर व्हा.चेअरमन पदी सुरेश पंडित बडगुजर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या कामी ए. आर. ऑफीस अधिकारी अजित पाटील यांचे सहकार्य लाभले या परिसरात २० वर्षा पासून चांगल्या पद्धतीने काम करीत असून संस्था आपल्या नवीन स्वताची भव्य जागेत गुडीपाडव्याचा मुहर्तावर पदार्पण केले आहे व सभासदांसाठी नवीन योजना राबवून निशुल्क कोणत्याही बँकेची कॅश भरणे, कॅश देणे, लाईटबिल भरणे, पैसे ट्रान्सपर करणे अशा योजना लागू केल्या आहेत. तरी या कामी परिसरातील लोकांनी अभिनंदन केले असून चेअरमन व संस्थेत परिसरात अभिनंदन करण्यात येत आहे.