आजचं राशिभविष्य, सोमवार ७ मार्च २०२२ : आज चंद्र दिवस-रात्र मेष राशीत संचार करेल. मेष राशीच्या लोकांना चंद्राच्या या संचारामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी नशिबाचा आणि मेहनतीचा पुरेपूर फायदा होईल.
मेष:-
वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. वडीलधार्यांचे मत विचारात घ्यावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी. क्षणिक गोष्टीने खट्टू होऊ नका. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल.
वृषभ:-
मौल्यवान वस्तू खरेदी कराल. घरातील कामात रमून जाल. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. मनातील गैरसमज बाजूला ठेवावेत. विचारांची दिशा बदलून पहावी.
मिथुन:-
क्षुल्लक कारणावरून होणारे मतभेद टाळावेत. कामातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करावा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. उष्णतेचा त्रास जाणवेल. आरोग्याबाबत हयगय करू नका.
कर्क:-
अपचनाचा त्रास जाणवू शकतो. हातातील कामात यश येईल. उगाचच कोणाशीही वादात अडकू नका. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा. मनातील अनामिक भीती बाजूला सारावी.
सिंह:-
खेळात अधिक वेळ घालवाल. मुलांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. भागीदारीचा लाभ उठवावा. पोटाची काळजी घ्यावी लागेल.
कन्या:-
कौटुंबिक कामात गुंतून राहाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे. नवीन वाहन खरेदीचा विचार मनात डोकावून जाईल. जोडीदाराची उत्तम साथ राहील.
तूळ:-
जवळचा प्रवास करावा लागेल. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. हातातील अधिकार योग्य वेळी वापरावेत. हितशत्रूंचा त्रास कमी होईल. कामाचे समाधान लाभेल.
वृश्चिक:-
मत्सराला बळी पडू नका. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. फसवणुकीपासून सावध राहावे. कामाची व्याप्ती वाढवता येईल. बोलतांना भान राखावे.
धनू:-
तुमची छाप पाडण्याचा प्रयत्न कराल. क्षुल्लक गोष्टीवरून चिडचिड करू नका. कौटुंबिक काळजी सतावत राहील. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे.
मकर:-
शांत व संयमी भूमिका घ्याल. जबाबदारी ओळखून वागावे. नवीन साहित्य वाचनात येईल. जमिनीच्या व्यवहारातून लाभ होईल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल.
कुंभ:-
कामाचा ताण राहील. गप्पांची हौस पूर्ण करता येईल. चौकसपणा दाखवावा लागेल. आपले विचार उत्तमरीत्या मांडण्याचा प्रयत्न करावा. हट्टीपणा दूर सारावा लागेल.
मीन:-
झोपेची तक्रार जाणवेल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. कागदपत्रे नीट तपासून पहावीत. प्रलोभनापासून दूर राहावे. जामीनकीच्या व्यवहारात सावधानता बाळगावी.