जळगाव (प्रतिनिधी) व्हॉटस्ऍपवर स्टेटस ठेवून महापुरूषाची विटंबना करण्यात आली तसेच धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात बुधवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार असे की, व्हॉटस्ऍपवर मोबाईल क्रमांक ९९४४०२५४७३६६ व ९९४४०६६७२६७७ या क्रमांकाच्या मोबाईल क्रमांकाच्या अज्ञात व्यक्तीने व्हॉटस्ऍपवच्या स्टेटसवर महापुरूषांनी विटंबना करणारे छायाचित्र तयार करुन ते ठेवले होते. यामुळे समाजाची बदनामी होवून समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. हा प्रकार शिवाजीनगर हुडको येथील प्रथमेश अरुण श्रीवंत या तरुणाच्या लक्षात आला. त्याने खबरदारी म्हणून तत्काळ या प्रकाराबाबत बुधवारी रात्री शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरुन ९९४४०२५४७३६६ व ९९४४०६६७२६७७ या मोबाईल क्रमांकाच्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सोनार हे करीत आहेत.
















