TheClearNews.Com
Wednesday, September 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिल्ली दंगे : सत्र न्यायालायने केला दिल्ली पोलिसांना २५ हजारांचा दंड !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 15, 2021
in कोर्ट, गुन्हे, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीत उसळलेल्या दंगलीच्या काळात योग्यरीतीने कर्तव्य पार न पाडणार्‍या दिल्ली पोलिसांना स्थानिक सत्र न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विनोद यादव यांनी हा दंड ठोठावला आहे.

मागील वर्षी उसळलेल्या दंगलीत मोहम्मद नासिर याला डोळ्यात गोळी लागली होती. एफआयआर दाखल करण्यासाठी तो पोलिसांकडे गेला होता. मात्र, पोलिसांनी त्याची तक्रार दुसर्‍या एफआयआरसोबत जोडली. पोलिस आरोपींचा बचाव करीत आहे, असे पूर्ण प्रकरण पाहिल्यानंतर जाणवत आहे. दिल्ली पोलिसांनी आपले कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडलेले नाही, असे सत्र न्यायालयाने निर्णय देताना सांगितले. पोलिसांची भूमिका अतिशय शिथिल असल्याचे स्पष्ट करीत न्यायालयाने त्यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दरम्यान, न्यायालयाने दिल्ली पोलिसांचा अशा प्रकारचा तपास संवेदनाहीन व हास्यास्पद असल्याचे ताशेरे ओढले.

READ ALSO

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

मोहम्मद नासिर यांनी गेल्या वर्षी १९ मार्चला भजनपुरा पोलिस ठाण्यात नरेश त्यागी, सुभाष त्यागी, उत्तम त्यागी, सुशील, नरेश गौर व अन्य काही जणांविरोधात गोळीबार केल्या प्रकरणात फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी ही फिर्याद दाखल केली नाही. पोलिसांच्या अशा वर्तनाने निराश होऊन नासिर यांनी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला व त्यांच्याकडे फिर्याद दाखल करण्याची मागणी केली.

या दरम्यान दिल्ली पोलिसांनी नासिर यांच्या भागात हिंसाचार झाला होता त्या ठिकाणी ६ अन्य जणांना गोळी लागल्याची फिर्याद नोंद केली होती. ही फिर्याद पर्याप्त असल्याने नासिर यांची स्वतःची फिर्याद नोंद करण्याचे कारण उरत नाही, असा युक्तीवाद न्यायालयात केला होता. या गोळीबार घटनेची पूर्ण चौकशी होत असून गोळीबार करणाऱ्यांची ओळख पटली आहे व त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे न्यायालयाला सांगितले.

पण न्यायालयाने दिल्ली पोलिसांचा हा युक्तीवाद फेटाळत ३ जून २०२०मध्ये नासिर यांनी दाखल केलेली फिर्याद पोलिसांनी नोंद केली नाही असे निदर्शनास आणून दिले. नासिर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचेही तक्रारीत म्हटले होते. त्या तक्रारीकडे दिल्ली पोलिसांनी दुर्लक्ष केले असा ठपका ठेवला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
Next Post

पतंजली रिसर्च फाऊंडेशन ट्र्स्टला प्राप्तीकर खात्याकडून पाच वर्षांसाठी मिळाली करसवलत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गावठी कट्ट्यासह पुनगावातील दोघं अटकेत ; पाचोरा पोलिसांची सलग दुसर्‍या दिवशी मोठी कारवाई !

September 21, 2023

जून्या वादातून तरुणावर सशस्त्र हल्ला

September 15, 2025

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू !

April 7, 2023

तहसीलदार वैशाली हिंगेंचा अर्ज मॅटने फेटाळला !

November 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group