TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवाजी नगर परिसरासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 15, 2020
in गुन्हे, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील शिवाजी नगर परिसर हे झपाट्याने वाढत असून त्याच बरोबरीने गुन्हेगारी व अवैध धंद्यात सुद्धा या परिसरात लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे या परिसरात स्वतंत्र पोलीस ठाणे निर्मितीच्या मागणीसाठी भाजपा नगरसेविका गायत्री शिंदे यांच्यासह भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अॅड.शहेबाज शेख, वसंत पोळ, विलास खडके, उत्तम शिंदे, संजय सणस, धर्मेंद्र टेमकर यांनी नुकतेच उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन दिले आहे.

 

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

नगरसेविका गायत्री शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवाजी नगर परिसर हा शहरातील जुना तसेच संमिश्र व दाट वस्ती असलेला परिसर असून सदर परिसरात श्रमिक व मध्यमवर्गीय नागरिकांचा रहिवास आहे. भौगोलिक दृष्ट्या तसेच लोकसंख्येच्या दृष्टीने शिवाजी नगर परिसर हा झपाट्याने वाढत असून शिवाजी नगर परिसरात नव्याने अनेक उपवस्तांचा समावेश झालेला असून सदर परिसराची लोकसंख्या जवळपास ३६ हजार झाली आहे. सुरुवाती पासूनच सदर परिसर हा जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या सिमा क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेला आहे.

शिवाजी नगर येथे शहर पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक वर्षापासून फक्त एकाच पोलीस चौकी असून सदर पोलीस चौकीत २ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे वाढती लोकसंख्या व त्या अनुषंगाने वाढत चाललेली गुन्हेगारी यास आळा घालण्यासाठी फक्त दोन पोलीस कर्मचारी अपुरे पडत आहेत. एखादी घटना घडल्यास शिवाजी नगर परिसरातील नागरिकांना शहर पोलीस स्टेशन येथे येवून आपली तक्रार द्यावी लागते. त्यामुळे बऱ्याच वेळा घटनेच्या ठिकाणी पोलीस कुमक पोहचण्याआधीच गुन्हेगार पसार होतात. या सर्व परिस्थितीमुळे शिवाजी नगर परिसरातील स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. एक चौकीवर संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा भार येत असल्यामुळे या ठिकाणी गुन्हेगारी फोफावत आहे. सर्व परिस्थिती व लोकसंख्येचा विचार करता शिवाजी नगर परिसरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन असणे ही नितांत व काळाची गरज झाली आहे.

 

शिवाजी नगरास अनेक छोटे-मोठे रहिवासी परिसर जोडले गेले आहेत. सामाजिक व राजकीय दृष्टीने हा परिसर अती संवेदनशील असून, सदर परिसरात हिंदू, मुस्लीम, बोहरी, ख्रिश्चन अश्या अनेक समाजाचे व धर्माचे धार्मिक स्थळे व स्मशानभूमी, दफनभूमी असून, दर एक दोन दिवसात सदर परिसरात भांडणतंटे, चोरी, हाणामारी, पूर्ववैमस्यातून होणारे हल्ले अश्या प्रकारच्या घटना या घडत असतात. त्यामुळे दर महिन्याला शहर पोलीस स्टेशनला दाखल होणाऱ्या एकूण गुन्हयात जास्तीत जास्त गुन्हे शिवाजी नगर हद्दीतील असतात.

 

शहर पोलीस स्टेशन हे शिवाजी नगर परिसरापासून लांब अंतरावर असून, सदर ठिकाणी दोन पोलीस निरीक्षक व इतर सर्व कर्मचारी मिळून जवळपास १०० लोकांचे मनुष्यबळ आहे. सदर मनुष्यबळ हे अत्यंत तोकडे स्वरूपाचे आहे. तसेच या पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध प्रकारचे सण, मिरवणूक, निवडणुका, कायदा सुव्यवस्था, अति महत्त्वाच्या व्यक्तीचा बंदोबस्त, रात्रीची गस्त, गुन्हे तपास, चौकशी अर्ज, अकस्मात मृत्युची चौकशी, अपघात, राजकीय आंदोलने, समन्स व वॉरंटची बजावणी यासह अनेक दैनंदिन कामांचा ताण सुद्धा पडत आहे. अश्यात शिवाजी नगर सारख्या संवेदनशील भागात शहर पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सदर शिवाजी नगर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे कामी व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना भयमुक्त जिवन जगणेसाठी शिवाजीनगर येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
Next Post

अभिषेक पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट ; पक्षकार्याचा अहवाल केला सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शहरातील रस्त्यातील वादग्रस्त अतिक्रमण हटविण्यात यावे !

February 5, 2021

बिनकामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना मी काडीचीही किंमत देत नाही ; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

April 25, 2022

स्व. सलीमभाई पटेल यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध विकास कामांना सुरुवात !

August 11, 2023

हृदयद्रावक : अंगणात बहिणींसोबत खेळताना घडलं भयंकर ; चिमुकलीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू !

July 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group