जळगांव प्रतिनिधी – जोशी कॉलनीतील गुरू गोरक्षनाथ मंदिरात श्रीकृष्ण भक्त ह.भ.प.मनोज चंद्र महाराज हे भागवत कथेचे निरूपण करत आहेत. श्रीकृष्ण सुदामा भेटीचे वर्णन त्यांनी इतके उत्कटतेने केले की उपस्थित भाविक गहिवरले.यावेळी सादर झा झाकिने अक्षरशः डोळे ओळवले. यावेळी कथे ठिकाणी वासुदेव जोशी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश श्रीखंडे, धुले यांच्यासह सुरेश साळवे आदींनी उपस्थिती दिली. प्रसंगी श्री क्षेत्र गाळणे येथून महंत माधवनाथ यांच्यासह साधुसंत उपस्थित होते. त्यांच्याहस्ते जोशी समाजाचे कालनिर्णयाचे विमोचन करण्यात आले. संध्याकाळी भागवत ग्रंथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी परिसरातील महिलांनी रांगोळ्या काढून ग्रंथाचे पूजन करून स्वागत केले. रात्री ८ वा. ह.भ.प.संजय महाराज कसोदा यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.