धरणगाव (प्रतिनिधी) आज धन्वंतरी जयंती निमित्त धरणगाव येथील विक्रम ग्रंथालय येथे आरोग्यभारतीतर्फे धन्वंतरी पूजन करण्यात आले. यावेळी कोरोना महामारीमध्ये सर्व नागरिकांना व समाजाला चांगले आरोग्य लाभो अशी कामना करण्यात आली.
या कार्यक्रमास डॉ शैलेश सूर्यवंशी, डॉ मनोज अमृतकर ,डॉ स्वप्नील पाटील, डॉ पुष्कर महाजन तसेच रा स्व संघ तालुका संघचालक श्री मोहन चौधरी सर ज्येष्ठ स्वयंसेवक श्री विनय कापुरे, श्री ललित उपासनी, श्री भीका पवार, श्री शांताराम महाजन आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पूर्णतेसाठी श्री दिनेश पाटील व श्री अक्षय बागुल यांनी मदत केली.
















