धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बांभोरी प्र.चा शिवारातील गिरणा नदी पात्रातुन विना परवाना गौणखनिजांची चोरटी वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी दूरक्षेत्रात सुभाष रामचंद्र नन्नवरे (वय ६५, रा. जावाईनगर, बांभोरी प्र.चा ता. धरणगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पो.कॉ. जितेश सुभाष नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २२ एप्रिल २०२२ रोजी तालुक्यातील बांभोरी प्र.चा शिवारातील गिरणा नदी पात्रातुन सुभाष रामचंद्र नन्नवरे (वय ६५ वर्ष रा. जावाईनगर, बांभोरी प्र. चा. ता. धरणगाव) हे त्यांचे ताब्यातील एक ट्रक लाल रंगाची त्यात १ ब्रास वाळु (गौणखनिज) ने भरलेली ट्रकसह २०,४००० रुपये किंमतीची विना परवाना वाळु (गौणखनिज) चोरटी वाहतुक करीत असतांना मिळुन आला. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी दूरक्षेत्रात सुभाष रामचंद्र नन्नवरे (वय ६५, रा. जावाईनगर, बांभोरी प्र.चा ता. धरणगाव) याच्याविरुद्ध भा.द.वि.कं.३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पो.हे.कॉ विजय चौधरी हे करीत आहेत.