धरणगाव (प्रतिनिधी) बैल विक्रीसाठी बाजारात घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याकडून पैशाची मागणी करून त्याचा मोबाइल हिसकावल्याप्रकरणी चौघांना पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.
याप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम ३५२, ३५२(१), (२), २९६, १२६(२), ३०९ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित गणेश राजेंद्र धनगर (२१, धनगर गल्ली), बंटी रमेश महाजन (२३, हनुमाननगर, धरणगाव), शुभम ईश्वर पारधी (१९, धनगरगल्ली, धरणगाव), हर्षल शशिकांत पाटील (१९, बांभोरी, ता. धरणगाव) यांना पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपास पोनि पवन देसले करीत आहेत.