धरणगाव (प्रतिनिधी) तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे बैठक इंदिरा गांधी कन्या विद्यालयात नुकतीच संपन्न झाली. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करावयाची असून त्या संदर्भात नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीचा अध्यक्ष स्थानी सकल मराठा समाजाचे जिल्हा अध्यक्ष पी एम पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन, भाजपाचे नेते संजय महाजन, अँड वसंतराव भोलाणे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, काँग्रेसचे तालुका युवा प्रमुख चंदन पाटील उपस्थित होते. या प्रसंगी मार्गदर्शन करतांना पी.एम पाटील यांनी सांगितले शासनाच्या नियमानुसार व कोरोनाचे काटेकोर पालन करून आपल्याला शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करायची असून सर्वांनी शांत तेने उत्सव समिती पार पाडावी. ज्ञानेश्वर महाजन, अँड वसंतराव भोलाणे, दिपक वाघमारे यांनी सुद्धा आपली मनोगते व्यक्त केली. या प्रसंगी दिपक जाधव, बंटी पवार, छोटु जाधव, वाल्मीक पाटील, अमित शिंदे, सुधर्मा पाटील, हेमंत चौधरी, नंदु पाटील, गोपाल पाटील, गौरव आदी उपस्थित होते.