TheClearNews.Com
Wednesday, August 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ना.गुलाबराव पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य ; धरणगाव पोलिसात शरद कोळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु !

जाणून घ्या...कुणी दिलीय तक्रार आणि काय म्हटलंय तक्रारीत !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 3, 2022
in गुन्हे, जळगाव, धरणगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित जाहीर सभेत मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले होते. याप्रकरणी युवा सेनेचे महाराष्ट्र प्रचारक शरद कोळी यांच्याविरुद्ध गुरुवारी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद कोळी यांना भाषण करण्यास बंदी

READ ALSO

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्यावतीने धरणगावात मंगळवारी उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा झाली. यात बोलताना शरद कोळी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केले. यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.दुसरीकडे याबाबत धरणगाव व पाळधी येथील पोलिसांना गुर्जर समाजाच्या वतीने निवेदनही देण्यात आले होते. यात म्हटले आहे होते की, या वक्तव्यामुळे गुर्जर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे शरद कोळी यांच्यावर कारवाई करावी. तसेच या प्रकाराविरुद्ध गुज्जर स्नेहवर्धक मंडळ समाजाच्यावतीने जिल्हाभरात आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला होता. याबाबतचे निवेदन सपोनि जिभाऊ पाटील यांनी स्वीकारले. यानंतर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शरद कोळी यांना भाषण करण्यास बंदी घातली. यामुळे आज चोपडा तर उद्या मुक्ताईनगरातील शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेत ते भाषण करू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. तर, पोलीस प्रशासनाने याबाबतची नोटीस आज कोळी यांना जारी केली.

हॉटेलमध्ये पोलीस विरुद्ध शिवसेना 

नोटीस जारी करतानाच जळगाव एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील हे पथकासह जळगावात ते राहत असलेल्या रेल्वेस्टेशनजवळील हॉटेलमध्ये दाखल झाले. पोलीस ताब्यात घेणार असल्याचे वाटल्याने शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केली. हॉटेलमध्ये पोलीस विरुद्ध शिवसेना असे चित्र उभे राहिले होते. बराच वेळ त्याठिकाणी गोंधळ सुरू होता. अखेर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्यासह सर्व पदाधिकारी पायी चालत शहर पोलीस ठाण्यात पोहचले. सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांना संजय सावंत यांनी शरद कोळी कोणतेही भाषण करणार नसल्याची ग्वाही दिल्यावर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते पुढे मार्गस्थ झाले.

धरणगावात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु 

दुसरीकडे शिवसैनिक तथा शिंदे गटाचे कार्यालयीन प्रमुख बालू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शरद कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालू जाधव यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना सांगितले की, आमचे नेते गुलाबराव पाटील यांच्यावर शरद कोळी यांनी अर्वाच्च आणि शिवराळ भाषेत टीका केली होती. यामुळे आमच्या भावना दुखावल्या असून याबाबत मी पोलिसात दुपारीच तक्रार दिली होती. त्यानुसार आता गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार कोळी यांच्याविरुद्ध १५३ अ आणि २९५ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, शरद कोळी यांच्याविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यात त्यांना अटक केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून शिवसेना नेत्यांच्या ताफ्यामागे पोलिसांची वाहने देखील रवाना झाली आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
Next Post

मोठी बातमी : धरणगाव पोलिसात शरद कोळींविरुद्ध अखेर गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव दूध संस्थेच्या पाचोरा चिलिंग सेंटरला प्रशासक मंडळाची सरप्राईज भेट !

August 4, 2022

धरणगाव तालुक्यातील विवरे-भवरखेडा ग्रुप ग्रामपंचायतवर शिंदे गटाचा झेंडा !

September 27, 2022

ईकरा थिम कॉलेजला दोन सुवर्ण पदक

May 24, 2022

भुसावळ विभागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार फटका ; मध्य रेल्वे १० दिवस घेणार मेगाब्लॉक !

August 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group