जळगाव (प्रतिनिधी) राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे प्रसिद्ध गायिका व भुसावळ येथील संगीत शिक्षिका सौ.रजनी संदीप पवार (ह.मु.जळगाव) यांना जागतिक महिला दिनानिमित्त ‘नारीरत्न पुरस्कार २०२०-२१’ चे वितरण करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण सिंगल वुमन फाउंडेशनच्या अध्यक्षा मिनाक्षी चव्हाण व निवेदक आणि प्रती अमिन सयानी रतनकुमार थोरात, संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रजनी पवार यांच्या गीत व संगीत आणि शिक्षण क्षेत्राविषयीची माहिती ज्ञानेश्वर वाघ यांनी दिली. या पुरस्कारामुळे नवीन कार्यासाठी प्रेरणा मिळाली. या सन्मानामुळे कला क्षेत्रात आणखी बरेच काही शिकण्याची, इतरांना शिकवण्याची उमेद मिळाली, असे भावनिक मत पवार यांनी व्यक्त केले. तसेच त्यांच्या पुढील कार्यास मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.