TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवरात्री व वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून सावित्रीच्या लेकींना शालोपयोगी साहित्य वाटप

"वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल" - लक्ष्मणराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
October 15, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथे मोठा माळीवाडा परिसरात नवरात्री व वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून सावित्रीच्या लेकींना महेंद्र (भैय्या) महाजन मित्र परिवाराने विद्यार्थिनींना शालोपयोगी साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी केले. प्रास्ताविकात महेंद्र महाजन हे निरंतर समाजकार्यात अग्रेसर असतात. “शिकाल तर टिकाल” या वाक्याला अनुसरून शाळा सुरू व्हायच्या आधी प्रतिवर्षी विद्यार्थ्यांना मोफत वह्या, स्कूलबॅग, शूज व शालोपयोगी साहित्य उपलब्ध करून देतात. मागील काही दिवसांपूर्वी पिंपळे रस्त्यालगत असलेल्या तलावाचे खोलीकरण केले होते. तसेच, महेंद्र यांनी कोविड १९ च्या काळात मोठा माळीवाडा परिसरात व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जवळ आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप केलेल्या होत्या. त्यांनी केलेले आर्थिक व शारीरिक योगदान विसरता येणार नाही. आपल्यापुरतेच पाहणाऱ्या काळात गरजूंची मदत करणे कठीण असते. महेंद्र भाऊंसारखे मोजकेच लोकं इतरांच्या सेवेसाठी वाहून घेतात. (फरक इतकाच असतो की, ते कधीही प्रकाशझोतात येत नाही.) यामुळे अश्या लोकांकडून प्रेरणा मिळते. म्हणून इतरांनी सामाजिक कार्यात सहभागी होऊन प्रेरणा घेऊन अधिकाधिक सहभाग वाढवावा. याच उद्देशाने त्यांनी राबवलेला हा उपक्रम स्तुत्य आहे, व सर्व विद्यार्थी मित्र- मैत्रिणींना अनमोल उदाहरण देऊन “वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल” असे प्रतिपादन लक्ष्मणराव पाटील यांनी केले.

READ ALSO

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

आलेल्या सर्व मान्यवरांचे महेंद्र महाजन मित्र परिवाराकडुन पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव माळी होते तर उद्घाटक माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष निलेश चौधरी, लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंदनराव पाटील, जेष्ठ नागरिक तुळशीराम माळी, व्यापारी सेनेचे तालुकाप्रमुख दिनेश येवले, शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, नपा गटनेते विनय (पप्पू) भावे, विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, माळी समाजाचे पंच दशरथ बापू महाजन, विजय महाजन, पी. डी. पाटील, धानोराचे माजी सरपंच भगवान महाजन, शहरप्रमुख राजेंद्र महाजन, नगरसेवक विलास महाजन, भागवत चौधरी, सुरेश (बुट्या) महाजन, पत्रकार जितेंद्र महाजन, धर्मराज मोरे, माजी नगराध्यक्ष संजय चौधरी, हेमंत चौधरी, काँट्रॅक्टर मोहन महाजन, जगदंबा कन्स्ट्रक्शनचे वाल्मिक पाटील, भानुदास पाटील, तौसिफ पटेल, गुलाम मोमीन तसेच महात्मा फुले चौक येथील सर्व जेष्ठ सन्माननीय बंधू – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले चौक येथील सावित्रीच्या लेकींना वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विजय महाजन, भगवान महाजन, निलेश चौधरी, पी. एम. पाटील यांनी सामाजिक कार्यक्रमाची स्तुती केली व महेंद्र महाजन यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गुलाबराव वाघ यांनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून शहरात अनेक सामाजिक कार्यक्रम आम्ही राबवीत असतो. प्रत्येक वार्डात लसीकरण, कोरोना काळात रुग्णांची सेवा, शहरातील रस्ते, स्मशानभूमी, पाण्याची सोय, शौच्छालय गृह, विविध शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप, तरुणांसाठी वाचनालय, मार्गदर्शन शिबिर असे अनेक कार्यक्रम आम्ही शिवसेना पक्षाच्या व नगरपालिकाच्या माध्यमातून राबवित असतो. जनतेने आम्हाला सहकार्य करावे, असे प्रतिपादन गुलाबराव वाघ यांनी करून महेंद्र महाजन यांच्या सामाजिक उपक्रमाची स्तुती करून त्यांना व उपस्थितांना नवरात्रीच्या सदिच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनपर व्ही टी माळी यांनी उपस्थितांना अशोका विजयादशमी व वाचन प्रेरणा दिनाच्या सदिच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली. तर महेंद्र (भैय्या) महाजन यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी महात्मा फुले मित्र मंडळ व ज्ञानेश्वर माळी, शेखर माळी, कान्हा माळी, भाऊसाहेब माळी, नाना माळी, अभिजित माळी, ऋषिकेश माळी, दादू माळी, विक्रांत माळी, भरत माळी, गोलू माळी, योगेश माळी, मनोज माळी, भावेश माळी, पवन माळी, जयराम माळी, रवींद्र माळी आदींनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
Next Post

'गर्व से कहो हम हिंदू है' ; मनसेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नाआधीच दागिने व पैशांसाठी छळ ; तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या !

March 27, 2022

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांना उमेदवारी !

April 27, 2024

नाशिक : ४० लाखांची लाचप्रकरणी दिंडोरी प्रांताधिकारी निलेश अपार यांच्याविरुध्द गुन्हा !

June 29, 2023

भुसावळ गांजा प्रकरण : दुसर्‍या संशयीताला पोलिसांकडून अटक !

December 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group