नशिराबाद (सुनिल महाजन) येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यामंदिरात गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष जनार्दन माळी तर मंचावर प्रमुख अतिथी आपल्या गावातील दानशूर दाते भूषण गेंदालाल चौधरी, मुख्याध्यापक सी बी अहिरे, प्रविण महाजन, पर्यवेक्षक बी आर खंडारे हे उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांचा परिचय आर एल पाचपांडे यांनी करुन देऊन मंचावरील सर्वांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात भूषण गेंदालाल चौधरी यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ अतिशय गरजू, गरीब, होतकरू, मेहनती आणि हुशार विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप केले. अध्यक्षीय भाषणात जनार्दन माळी यांनी भूषण गेंदालाल चौधरी यांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्र संचालन अनिल चौधरी यांनी केले.