पुणे (वृत्तसंस्था) कोरोना प्रतिबंधक अशा ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे अखेर सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाला पुणे येथून वितरण सुरू झाले आहे. सीरम इन्स्टिटयूटमधून ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे सहा कोल्ड स्टोअरेज कंटेनर रवाना करण्यात आले आहेत. त्यापैकी तीन कंटेनर हे पोलिसांच्या बंदोबस्तासह पुणे विमानतळाच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, त्याआधी इन्स्टिटयूटच्या परिसरात या कंटेनरची पूजा करण्यात आली.
कोरोना व्हॅक्सीनची पहिली खेप मंगळवारी सकाळी पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूमधून रवाना झाली. ज्या ट्रकमधून हे नेण्यात आले, त्याचे टम्परेचर तीन डिग्री ठेवण्यात आले. येथून व्हॅक्सीनचे ४७८ बॉक्स देशाच्या १३ शहरांमध्ये पोहोचवण्यात येतील. प्रत्येक बॉक्सचे वजन ३२ किलो आहे. पहिल्या चरणात, दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु, करनाल, हैदराबाद, विजयवाडा, गुवाहाटी, लखनौ, चंडीगड आणि भुवनेश्वरमध्ये हवाई मार्गाने व्हॅक्सीन पोहोचवण्यात येईल. मुंबईमध्ये थेट ट्रकने व्हॅक्सीन पाठवण्यात येईल. कोरोना व्हॅक्सीनची पहिली खेप सर्वात पहिले एअर इंडियाच्या फ्लाइटने गुजरातला पाठवण्यात येत आहे. गुजरातचे उप-मुख्यमंत्री नितिन पटेल यांनी सोमवारी सोशल मीडियावर सांगितले होते की, त्यांच्या राज्यात व्हॅक्सीनची पहिली खेप सकाळी पावने अकरा वाजता पोहोचेल. अहमदाबादचे सरकार वल्लभभाई पटेल एअरपोर्टवर व्हॅक्सीनची डिलीव्हरी होईल.
केंद्र सरकारने सोमवारी सीरम इंस्टीट्यू आणि भारत बायोटेकला कोरोना व्हॅक्सीनचे सहा कोटींपेक्षा जास्त डोजची ऑर्डर दिली. सरकार सर्वात पहिले देशातील तीन कोटी फ्रंटलाइन हेल्थ वर्कर्सला कोरोनाची लस देणार आहे. ज्याची सुरुवात १६ जानेवारीपासून होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारीही सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती आणि व्हॅक्सीनसंबंधीत तयारीचा आढावा घेतला होता.
भारत सरकारने लस खरेदीसाठी काल सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाला ऑर्डर दिली होती. सरकार सीरमकडून ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे एक कोटी १० लाख डोस खरेदी करणार आहे. ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने मिळून विसिकत केलेल्या या लसीची निर्मिती पुणे स्थित सीरम इन्स्टिटयूटने केली आहे. जीएसटीसह लसीच्या प्रत्येक डोसची किंमत २१० रुपये असेल असे सीरमच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले आहे.