जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँक निवडणुकीसाठी इतर संस्था व वैयक्तिक प्रवर्गातील उमेदवार प्रकाश यशवंत सरकार यांची माघार निवडणुक अधिकारी यांनी वेळे अभावी स्विकारली नाही. त्यामुळे प्रकाश सरकार यांनी शेतकरी पैनलमधील उमेदवार रविंद्र सुर्यमान पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
माझी उमेदवारी जिल्हा बँकेसाठी इतर संस्था व वैयक्तिक प्रवर्गात उमेदवारी केलेली होती परंतु माघारीस आलो असता वेळ अभावी (टाईम ०३:०५) माझी माघार मनिवडणूक अधिकारी यांनी स्विकारली नाही. तरी या जिल्हा बँकेसाठी इतर संस्था व वैयक्तीक प्रवर्गात मी रविंद्र सुर्यमान पाटील उमेदवार शेतकरी पैनल यांना जाहिर पाठींबा देत असुन स्वखुशीने या निवडणूक काळात आपले बहुमोल मतदान रविंद्र सूर्यमान पाटील अ.क्र.०३ निशाणी मोटार गाड़ी यांना करावे, असे आवाहन प्रकाश यशवंत सरकार यांनी केलं आहे.