TheClearNews.Com
Tuesday, July 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता !

जागतिक बाल कामगार प्रथा विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
June 11, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बाल कामगार गंभीर समस्या असून त्याचे संपूर्ण निर्मूलन झाले पाहिजे. बालकाना बालक म्हणून असलेले त्यांचे हक्क मिळाले पाहिजे. याकरीता जळगाव जिल्हा बाल कामगार मुक्त होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जागतिक बाल कामगार विरोधी दिनाच्या (१२ जून) पूर्वसंध्येला केले.

बाल कामगार ही अनिष्ट प्रथा असून खेळण्या बागडण्याच्या वयात लहान मुलांना शिक्षणापासून वंचित करून कष्टाच्या कामाला जुंपले जाते. कोवळ्या खांद्यावर कामाचे ओझे टाकून त्यांच्या बालपणाचा आनंद हिरावून घेतला जातो. त्यामुळे बालकांच्या सर्वांगीण विकासावर विपरीत परिणाम होतो. देशाचे भविष्य असलेला बालक सुजाण, कार्यक्षम व जबाबदार नागरिक होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.

READ ALSO

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

क्लास चालकाची ७ लाखात फसवणूक

जागतिक बाल कामगार विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, जळगाव व राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प संस्था, जळगाव यांच्यामार्फत विविध ठिकाणी बालकामगार प्रथा विरोधी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. बालकामगार प्रामुख्याने आढळून येणा-या हॉटेल्स, धाबे, चहा टपरी, गॅरेजेस, विटभट्टी, बांधकाम उद्योग आदि ठिकाणी भेटी देऊन बालकाचे बालपण टिकवून त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच आस्थापना मालकांना कायद्यातील तरतुदींची माहिती समजावून सांगण्यात येणार असून विविध आस्थापनांना भेटी देऊन मालकांकडून बालकामगार कामावर ठेवणार नाही असे हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. तसेच येथे बालकामगार कामावर ठेवले जात नाही असे स्टिकर दुकानांमध्ये दर्शनी भागात लावण्यात येणार आहे.

बालकामगार प्रामुख्याने आढळून येणा-या ठिकाणी भविष्यात धाडसत्रे मोहिम आयोजित करण्यात येणार असून बालकामगार ठेवणा-या मालकाविरोधात सक्त कारवाई करण्यात येणार आहे. व्यापारी असोसिएशन, उद्योजक संघटना, स्वयंसेवी संघटना यांनाही या जनजागृती कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे. तसेच बालकामगार कामावर ठेवू नये याबाबत विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी राऊत यांनी यंत्रणांना दिले आहेत.

बाल व किशोरवयीन (प्रतिबंध व नियमन) कामगार अधिनियम, १९८६ च्या तरतुदींनुसार १४ वर्षाखालील कोणत्याही बालकास कोणत्याही आस्थापनेत कामावर ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. कोणत्याही आस्थापनेत बालकामगार काम करत असल्याचे आढळून आल्यास त्या मालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येते. दोषी मालकास ६ महिने ते २ वर्षापर्यंत कारावास तसेच रुपये २० हजार ते रुपये ५० हजारापर्यंत आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही मालकाने आपल्या आस्थापनेत बालकाना कामावर ठेवू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बालकामगार काम करत असल्यास सुजाण नागरिकांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, डॉ आंबेडकर मार्केट, जिल्हापेठ, जळगाव यांचेकडे अथवा संबंधित विभागातील पोलिस स्टेशन येथे अथवा चाईल्ड लाईनच्या १०९८ या टोल फ्री नंबरवर तक्रार दाखल करावी. असे आवाहन चंद्रकांत बिरार, सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026
गुन्हे

क्लास चालकाची ७ लाखात फसवणूक

July 20, 2026
जळगाव

स्मार्ट मीटरबाबत शंकानिरसनासाठी महावितरणतर्फे मंगळवारी ग्राहक संवाद मेळावे

July 19, 2026
गुन्हे

गुंतवणुकीवर मोठ्या नफ्याचे अमिष दाखवत निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेसात लाखांचा गंडा

July 19, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
जळगाव

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे.

July 18, 2026
Next Post

जिल्ह्यात २५ जूनपर्यंत ३७ (१) (३) कलम जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्राला लसींचे डोस कमी मिळाले; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा केंद्र सरकारवर आरोप

January 13, 2021

नातूला सोबत घेत आजोबा सायकलवर शेतात जायला निघाले, वाटेत घडलं भयंकर !

October 30, 2023

संतापजनक : खडके आश्रम शाळेत मुलींनंतर आता एका मुलाचेही लैंगिक शोषण झाल्याचे उघड !

July 30, 2023

समर्थ के बिना कौन शिवाजीराजे को पूछेगा? ; राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य

February 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group