धरणगाव (प्रतिनिधी) मागील काही दिवसांपासून धरणगाव शहरात कोरोनाच्या रुग्णांची मोठी वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी पालिकेचे गटनेते पप्पू भावे यांच्यासह शिवसैनिक रवींद्र कंखरे यांनी त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.
आज रात्री जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व सिव्हील सर्जन श्री. चव्हाण साहेब यांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसैनिक रवींद्र कंखरे यांनी सविस्तर चर्चा केली. श्री.कंखरे यांनी धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय अधिकारी द्या, अशी मागणीण काल रात्रीच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी लागलीच सकाळी डॉ.भंगाळे यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच दवाखान्यात नातेवाईक व आणि बाहेरचे लोक जास्त गर्दी करतात म्हणून पोलीस बंदोबस्त देण्यात येईल, असेही आश्वासन दिले.
याबाबत जि.प.सदस्य तथा युवा नेते प्रतापराव पाटील हे सुध्दा पाठपुरावा करीत होते. यावेळी रवींद्र कंखरे, शिवसेना गटनेते पप्पू भावे, नगरसेवक विलास महाजन, भानुदास विसावे, राहुल रोकडे यांच्यासह आदी उपस्थित होते.