जळगाव (प्रतिनिधी) दरवर्षी जागतिक कौशल्य स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याकरिता जिल्हास्तर, विभागीयस्तर आणि राज्यस्तरावर परिक्षा होवून निवड झालेल्या उमेदवारांची देशपातळीवरील स्पर्धेसाठी निवड केली जाते. यावर्षी दिनांक १७ व १८ ऑगस्ट, २०२१ रोजी जिल्हास्तरावर, दिनांक २३ व २४ ऑगस्ट रोजी विभागीय स्तरावर आणि दिनांक ३ ते ५ सप्टेंबर, २०२१ दरम्यान राज्यस्तरावर स्पर्धा घेण्याचे निश्चित झालेले आहे.
जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या स्पर्धेत सहभागी होण्याकरीता १५ ऑगस्ट, २०२१ पर्यंत “महास्वयंम” पोर्टलवरील लिंकव्दारे नोंदणी करणे आवश्यक आहे. सर्व नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या स्पर्धा घोषीत कार्यक्रमानुसार होतील. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी “महास्वयंम” पोर्टलवरील लिंकव्दारे स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा. असे आवाहन डॉ. राजपाल कोल्हे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
“महास्वयंम” पोर्टलवरील गुगल लिंक:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScc9hV8zb9-eIBlPWfEYny_XK0485eibd8vzLbX24LphXPQDw/viewform