जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा नियेाजन समितीची बैठक राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, ३० ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी १.०० वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
या बैठकीत समितीच्या २९ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त मान्य करणे, जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ मध्ये माहे मार्च-२१ अखेर झालेल्या खर्चास मंजुरी देणे (सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र), जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ मध्ये माहे जुलै-२१ अखेर खर्चाचा आढावा घेणे, (सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी उपयोजना बाहय क्षेत्र), नियोजन विभाग, शासन निर्णय दि. २८ एप्रिल, २०२० नुसार सन २०२०-२१ मध्ये मंजुर नियतव्यय रु. ३७५ कोटीच्या २५ टक्केच्या मर्यादेत कोविड-१९ उपाययोजनांसाठी खर्च करण्यात आलेल्या ४४ कोटी ९ लाख १६ हजार रुपयांच्या निधीस कार्योत्तर मंजुरी देणे, नियोजन विभाग, शासन निर्णय, दिनांक १९ एप्रिल २०२१ नुसार सन २०२१-२२ साठी एकूण मंजुर नियतव्यय रुपये ४०० कोटीच्या ३० टक्के रक्कम रुपये १२० कोटी निधी कोविड-१९ उपययोजनांसाठी खर्च करण्याच्या पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देणे तसेच अध्यक्षांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार असल्याचेही जिल्हा नियोजन अधिकारी पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
















