जळगाव (प्रतिनिधी) शासनाकडील २ ऑगस्टच्या आदेशान्वये नाशिक विभागातील अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे निर्बध लागु असुन इतर जिल्ह्यात निर्बध शिथील करण्यात आले आहे. नाशिक विभागाचा विभागीय लोकशाही दिन दि. ११ ऑक्टोबर, २०२१ रोजी दुपारी १२.०० वाजता विभागातील दहा विभागप्रमुख यांचे उपस्थित आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती गोरक्ष गाडीलकर, उपायुक्त (महसुल) विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचेकडील २ ऑगस्ट, २०२१ च्या आदेशान्वये कोविड-१९ च्या फैलावास प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यात निर्बध/सुचना निर्गमित करण्यात आल्याचेही गाडीलकर यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.