जळगाव (प्रतिनिधी) ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक करीता आचारसंहिता लागू असल्याने नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२० करीता आदर्श आचारसंहिता लागू असल्याने नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात ११ जानेवारी, २०२१ रोजी होणारा विभागीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव राहुल पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.