चाळीसगाव (प्रतिनिधी) सध्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असून चाळीसगाव ट्रामा सेंटरला जिल्हाधिकारी यांनी एम डी फिजिशियन पद मंजूर केले त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. मात्र उपलब्धता होऊ शकली नसून मागील वर्षी कोरोनात चाळीसगाव येथील डॉक्टरांनी जनतेची सेवा केली आताही डॉक्टरांनी देवदूत बनून पुढे यावे, असे आवाहन वृत्तवाहिनी पत्रकार व चाळीसगाव विकास मंचचे प्रफुल्ल साळुंखे यांनी केले आहे.
कोरोना मूळे चाळीसगाव नव्हे तर जिल्हा आणि राज्याची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. आज चाळीसगाव ट्रामा सेंटरला जिल्हाधिकारी यांनी एम डी फिजिशियन पद मंजूर केले त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. पण चाळीसगाव शहरात तज्ञ फिजिशियन डॉक्टरांची उपलब्धता होऊ शकली नाही. सर्वत्र खाजगी दवाखाने देखील कोविड रुग्णांनी भरले आहेत. चाळीसगाव येथून धुळे, नाशिक, औरंगाबाद येथे जरी रुग्ण नेला तरी त्या भागात व्हेंटिलेटर मिळत नाही. अशा भयावह कात्रीत सर्व जनता अडकली आहे.
गेल्या वर्षी कोरोना काळात चाळीसगाव शहरातील सर्व डॉक्टरांनी सामाजिक भान आणि दायित्व जपत तालुक्यातील जनतेची सेवा केली. त्याबद्दल सर्व जनता त्यांची कायम ऋणी आहोत. आज परिस्थिती गंभीर बनली असून ती आणखी भयावह होईल यापूर्वी डॉक्टर नी देवदूत बनून पुढे यावे. शहरातील तज्ञ डॉक्टरांनी (प्रत्येक दिवशी एक) अशी ट्रामा केअर सेंटर ला तपासणी केली. तरी अनेक जणांचे प्राण वाचू शकतील अनेक गरीब कुटुंबाना आशेचा किरण दिसेल. सर्व डॉक्टरांना कळकळीची विनंती, देवदूत बनून पुढे यावे असे आवाहन वृत्तवाहिनी पत्रकार व चाळीसगाव विकास मंचचे प्रफुल्ल साळुंखे यांनी केले आहे.