TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

गावाकडून न येता नदीपात्राकडून आले चोरटे; घटना सीसीटीव्हीत कैद

vijay waghmare by vijay waghmare
June 30, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – मध्यरात्रीच्या सुमारास गावातील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी चोरुन नेल्याची घटना दि. २७ जून रोजी तालुक्यातील आमोदा बु. गावात घडली. चोरटे गावाकडून न येता गिरणा नदीपात्राकडून मंदिरात पोहचले. दरम्यान, चोरीची संपुर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी ते फुटेज ताब्यात घेतले. तर दानपेटी ही मंदिरापासून जवळच असलेल्या झुडपात मिळून आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील आमोदा बु. गावात राहणारे पंढरीनाथ आसाराम सुर्यवंशी (वय ७३) हे सेवानिवृत्त पोस्ट मास्टर आहे. दि. २६ जून रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास त्यांच्या गावातील भिकारी गुलचंद पाटील यांच्या जागेत बांधलेल्या एकविरा मातेच्या मंदिरातील पुजारी पंजाबराव अजबराव सुर्यवंशी हे मंदिर बंद करुन घरी निघून गेले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास पुजारी सुर्यवंशी हे नित्यनियमाप्रमाणे पुजेसाठी मंदिरात आले असता, त्यांना मंदिरातील दानपेटी चोरी गेल्याचे दिसले. त्यांनी लागलीच फोन करुन घटनेची माहिती पंढरीनाथ सुर्यवंशी यांना दिल्यानंतर ते देखील तात्काळ मंदिरात पोहचले.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

अनेक दिवसांपासून जमा झाली होती रक्कम

तालुक्यातील आमोदा येथे एकवीरा मातेचे मंदिर असून या ठिकाणी असलेल्या दानपेटीत अनेक दिवसांपासूनची रक्कम जमा झाली होती. दि. २७ जून रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गावाकडून येणाऱ्या रस्त्याने न येता मंदिराच्या मागे असलेल्या गिरणा नदी पात्राकडून येणाऱ्या रस्त्याने मंदिराजवळ पोहचले.

झाडाझुडपात फेकून दिली दानपेटी

चोरटे स्वच्छतागृहाच्या भिंतीवर चढून ते मंदिरात उतरले. तेथून त्यांनी दानपेटीच उचलून नेली. त्यानंतर साधारण ३०० ते ४०० मीटर अंतरावर असलेल्या पीरबाबा टेकडीजवळ नेऊन दानपेटी फोडली आणि दानपेटी तेथील झाडाझुडपात फेकून देत त्यातील रोकड घेवून चोरटे पसार झाले.

पोलिसांची घटनास्थळी पाहणी

पहाटे पुजारी पंजाबराव सूर्यवंशी हे मंदिरात आले तेव्हा ही घटना त्यांच्या लक्षात आली. त्यांनी मंदिराचे पदाधिकारी व ग्रामस्थांना कळविले. त्या वेळी या सर्व मंडळींसह तालुका पोलिस ठाण्याचे पोहेकॉ प्रवीण पाटील, दिनेश चव्हाण हे घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांनी मंदिराच्या परिसरात पाहणी केली.

मंदिराच्या सीसीटीव्हीत चोरटे कैद

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, त्यांना मध्यरात्री १ वाजून ५५ मिनिटांनी चोरटे मंदिरात शिरले आणि त्यांनी अडीच वाजेच्या सुमारास दानपेटी चोरुन नेल्याचे कैद झाले आहे. ते सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले असून याप्रकरणी तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonDonation box stolen from Ekvira Mata temple in Amoda

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
Next Post

एक भारत... एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : चोरट्याने लांबविला चक्क महिला पोलीस उपनिरीक्षकाचाच मोबाईल !

July 26, 2021

मोठी बातमी : राऊतांचा 60 दिवस तर खडसेंचा 67 दिवस केला फोन टॅप

April 11, 2022

जलसंधारण, पर्यावरण रक्षणाची गरज : आरिफ शेख

March 22, 2022

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२३ !

October 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group