TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दोनगावच्या ‘निर्भया’ची धारावी बँक वेबसिरीजसाठी निवड ; सुनील शेट्टीसोबत झळकणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 20, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील दोनगाव या छोट्याशा गावातील मूळ रहिवासी व मुंबई पोलीस असलेल्या लीलाधर पाटील यांची कन्या ‘निर्भया’ने जळगावचे नाव उंचावले आहे. ‘धारावी बँक’ या वेबसिरीजसाठी तिची निवड झाली आहे. सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय, सोनाली कुलकर्णी सारखे दिग्गज स्टारकास्ट वेबसिरीजमध्ये आहेत.

दिग्गज अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

धरणगाव तालुक्यातील दोनगाव या छोट्याशा गावातील मूळ रहिवासी व मुंबई पोलीस असलेल्या लीलाधर पाटील यांनी सेवा बजावत असतानाच अभिनयाची आवड जोपासली. ते पाहून त्यांची मुलगी निर्भयानेदेखील ही कला आत्मसात केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला अनेकांपर्यंत पोहाेचवणाऱ्या निर्भयाची ‘धारावी बँक’ या वेब सिरीजसाठी निवड झाली आहे. दिग्गज अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी तिला मिळाली.

सुमीत कक्कड दिग्दर्शित ‘धारावी बँक’ वेब सिरीजमध्ये अभिनयासाठी निर्भयाची निवड

दोनगाव या छोट्याशा खेड्यातून लीलाधर पाटील या तरुणाने आपल्या जीवनाचा प्रवास सुरू केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली आणि फौजदार म्हणून त्यांची निवड झाली. मुंबई पोलिसात सेवा बजावत असताना त्यांना अभिनयाबद्दल रुची निर्माण झाली आणि वरिष्ठांच्या परवानगीसह त्यांनी अभिनय क्षेत्रात काम सुरू केले. वडिलांना टीव्हीवर बघून त्यांची अकरा वर्षाची मुलगी निर्भयालासुद्धा वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात रस निर्माण झाला. टिकटॉक, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल व्यासपीठांवर निर्भया लहान-मोठी अभिनयाची चुणूक दाखवत होती आणि आता नुकतीच निर्भयाची सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय, सोनाली कुलकर्णी या दिग्गज अभिनेत्यांसोबत सुमीत कक्कड दिग्दर्शित धारावी बँक या वेब सिरीजमध्ये अभिनयासाठी निवड झाली आहे.

खान्देशातून चंदेरी दुनियेत पाय ठेवायला सुरुवात

निर्भया या वेब सिरीजमध्ये सुनील शेट्टी यांच्या नातीची भूमिका साकारणार आहे. लीलाधर पाटील यांचे आई-वडील दोनगाव येथे शेती करतात. अतिशय सामान्य कुटुंब व्यवस्थेतून लीलाधर पाटील आणि निर्भया यांनी चंदेरी दुनियेत खान्देशातून पाय ठेवायला सुरुवात केलेली आहे. निर्भया आणि लीलाधर पाटील यांच्या या बॉलीवूडमधील पदार्पणामुळे खान्देशची मान उंचावली आहे.

वडिलांसह मुलीचे बॉलीवूडमध्ये पदार्पण

वेब सिरीजसाठी निर्भयाला तमिळ भाषेत ऑडिशन द्यायचे होते. एका सामान्य मराठी कुटुंबातील मुलीने यासाठी तमिळ भाषा अभ्यासायला सुरुवात केली. तिची आई वैशाली पाटील यांनी तिच्याकडून मेहनत करून घेतली आणि पहिल्याच ऑडिशनमध्ये सुनील शेट्टी यांच्या कौतुकाला पात्र ठरत निर्भयाची निवड झाली. निर्भयाचे वडील लीलाधर पाटील यांनाही क्राइम पेट्रोल, ठिपक्यांची रांगोळी, तेरा यार हू मै या मालिकांसह दोन वेब सिरीजमध्ये पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका मिळालेली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
Next Post

शारदा उंबरकर "राष्ट्रीय आदर्श शिक्षिका" पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात ६ जानेवारीपर्यंत ३७ (१) व (३) कलम जारी

December 23, 2020

थकबाकीदारांवर कारवाईचा इशारा; ग्रामपंचायत सदस्यांना कर भरण्याचे आवाहन

March 26, 2025

कोविडच्या अनुषंगाने दक्षता व आवश्‍यक उपचाराबाबत आरोग्य यंत्रणेने सजग रहावे : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

July 19, 2021

धरणगाव बनावट मद्य छापा प्रकरण : तस्करीचे धागेधोरे धुळ्यापर्यंत पोहचले ; आरोपींची संख्याही वाढली !

January 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group