जळगाव (प्रतिनिधी) भाजपची काळजी करू नका, तुमच्या मतदार संघात राष्ट्रवादी जीवंत ठेवा असा टोला आमदार गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना लगावला आहे.
जामनेरात राज्य सरकारविरोधात भाजपतर्फे निषेध मोर्चा काढला होता. यावेळी आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधताना खडसेंवर निशाणा साधला. खडसेंनी राजकारणातून सन्यास न घेता त्यांनी राजकारणात राहून लढावे. परंतु, रडीचा डाव खेळू नये, असे देखील महाजन म्हणाले. विधानसभा हरलात. कोथडी गावात सदस्य निवडून येत नाही आता बोदवड नगरपंचायत गेली. पराभव झाला म्हणून कोणाची युती होती म्हणून झाले असे बोलू नये, आपल्या मनगटात जोर असायला हवा. जामनेरात सर्व पक्ष सोबत येतात, परंतु भाजप वेगळे राहते. तरी देखील बहुमत मिळाले आहे. मुळात खडसेंना जनतेनेच नाकारले आहे. मुख्यमंत्रीच्या लेव्हलचा माणूस म्हणतात, तर मतदार संघातील ग्रामपंचायती निवडून आणावी, असे आव्हानच महाजनांनी खडसेंना दिले आहे.