धरणगाव (प्रतिनिधी) डॉ.नितीन वसंतराव पाटील यांचे शालक डॉ.आशुतोष भगवानराव मगर हे नुकतेच प्रथम श्रेणीतून नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठातून नुकतेच एम.बी.बी.एस उत्तीर्ण झाले आहेत. गावातून प्रथम एमबीबीएस डॉक्टर होण्याचा श्री. मगर यांनी मान मिळवला आहे.
डॉ. आशुतोष मगर हे गाव साकुर (उपखेड) तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील रहिवाशी आहेत. मगर गावातील पहिले एमबीबीएस डॉक्टर ठरल्याने ते गावासाठी अभिमानाचा विषय ठरले आहेत. त्यांचे पुढे एमडी होण्याचे स्वप्न आहे. त्यांच्या आई सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. तर वडील वनाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत