यावल (सुरेश पाटील) येथील प्रसिद्ध डॉक्टर अतुल गुणवंतराव सरोदे यांची कोविड-19च्या राष्ट्रीय स्तरावरील ‘कोविड-19ऑन अप्रोप्रिएट बिहेवीअर’ समितीवर निवड झाल्याबद्दल त्यांचा आश्रय फाउंडेशनच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला.
ICMR व नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सच्यावतीने गठीत करण्यात आलेल्या व देशभरातील ख्यातनाम डाॅक्टर आणि वैज्ञानिक यांचा समावेश असलेल्या या समितीत डॉ.अतुल सरोदे यांचा ही समावेश आहे, ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानस्पदबाब आहे. या उत्तुंग भरारीबद्दल यावल-रावेर तालुका स्तरीय आश्रय फाऊंडेशनतर्फे डॉ.अतुल गुणवंतराव सरोदे यांना सन्मानपत्र व पुष्प गुच्छ देऊन त्यांच्या राहत्या घरी सन्मान करण्यात आला. या वेळी आश्रय फाऊंडेशन पदाधिकारी डॉ.कुंदन फेगडे, डॉ.शैलेश खाचणे,डॉ.विलास पाटील,डॉ.पराग पाटील,डॉ.राजेश चौधरी,डॉ.भरत महाजन,डॉ.नितीन महाजन,डॉ दिलीप भटकर,डॉ.अभिजित सरोदे,डॉ.निलेश पाटील,डॉ.योगेश पाटील,डॉ.प्रशांत भारंबे,डॉ.प्रशांत जावळे,डॉ.प्रफुल्ल पाटील,डॉ.चेतन कोळंबे,डॉ.गौरव धांडे हे उपस्थित होते.