धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत असलेल्या डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत निवडणुकीत रेखा पाटील यांनी मंगलाबाई महाजन यांना जाहीर पाठींबा दिला आहे.
डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. माघारीच्या दिवशी वेळ निघून गेली होती. त्यामुळे रेखा दत्तात्रय पाटील ह्या उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकल्या नव्हत्या. परंतु आज त्यांनी जाहीररीत्या डॉ हेडगेवार नगर ग्रामपंचायत विकास पॅनलच्या मंगलाबाई परशुराम महाजन यांना पाठींबा दिला आहे. तसेच सर्व मतदार बंधू भगिनींनी माझ्या ऐवजी मंगलाबाई महाजन यांनाच मतदान करावे, ही विनंती देखील केली आहे.