धरणगाव (प्रतिनिधी) येथील महावीर अर्बन को ऑप क्रेडिट सोसा.लिमिटेड धरणगावच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. त्यात 2022 ते 2027 या कालावधीसाठी चेअरमन म्हणून डॉ. मिलिंद डहाळे तर व्हाइस चेअरमन म्हणून मंगलाताई प्रकाश पाटील यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी संचालक डॉ.अरुण कुलकर्णी, अजयशेठ पगारिया, संजय ओस्तवाल, अरविंद उर्फ राजू ओस्तवाल, नितीनशेठ नगरिया, मंदाताई जाधव, सुधाकर विसावे, अजय माळी, कैलास लोहार उपस्थित होते. चेअरमन निवड झाल्यानंतर संस्थेचे ज्येष्ठ सभासद भिकाअप्पा जाधव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच पतसंस्थेचे व्यवस्थापक बद्रीनाथ भाटिया, पंकज जैन, मयुर माळी, मनीषा जैन, प्रवीण ओस्तवाल, सागर बडगुजर, हेमंत ओस्तवाल यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. तर अजितकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.