TheClearNews.Com
Wednesday, June 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्हा नगररचना सहाय्यक संचालक आर. एम. पाटील यांच्या नियुक्तीला अमोल कोल्हेंचा आक्षेप

The Clear News Desk by The Clear News Desk
July 14, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा नगररचना सहाय्यक संचालक या पदावर आर. एम. पाटील यांची नुकतीच नियक्ती करण्यात आलेली आहे. या नियुक्तीला छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच आर. एम. पाटील यांच्या नियुक्तीची सखोल चौकशी करण्यात यावी, असे निवेदन अमोल कोल्हे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

जिल्हा नगररचना सहाय्यक संचालक या पदावर आर. एम. पाटील यांची नियक्ती करण्यात आलेली आहे. यापूर्वी काही वर्षांपूर्वी आर. एम. पाटील हे जळगाव येथे नगररचनाकार पदावर कार्यरत असतांना त्यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरलेली होती. नागरिकांशी तुसडेपणाने वागणे, अत्यंत भ्रष्ट हेतूने प्रकरणांमध्ये त्रुटी काढणे, कामात टाळाटाळ व दिरंगाई करणे अशा प्रकारच्या तक्रारी त्यांच्या विरुद्ध होत्या. तसेच यापूर्वी असलेल्या नियुक्तीच्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या विषयी गंभीर आरोप झालेले असुन चौकशी सुरू आहे. तरीही अशा परिस्थितीत त्यांना जळगाव जिल्ह्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर त्यांना जळगाव महानगरपालिका नगररचनाकार या पदाचा देखील चार्ज देण्यात आलेला आहे. पदाधिकाऱ्यांकडुन वारंवार नगरविकास विभागास या बाबींची जाणीव करून दिलेली असतांना सुध्दा नगरविकास विभागातील अधिकारी हे अशा प्रकारच्या भ्रष्ट आरोप असलेल्या अधिकाऱ्याची नेमणूक जळगाव शहरात करून काय साध्य करू ईच्छितात यामागे निश्चितच काही काळेबेरे असण्याची शक्यता नाकारता येत नाही .

READ ALSO

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

ग्राहकांनी नवीन मीटर बसवावे म्हणून जुन्या मीटर धारकांना दिले जाताय सरासरी बिले

अधिक माहिती घेतली असता असे कळले की, आर. एम. पाटील यांनी जळगाव शहरातील एका वादग्रस्त बिल्डर कडुन बराच मोठा खर्च नगरविकास विभागात करून तसेच महसूल विभागातील कार्यरत एका अधिकाऱ्याची स्वतःला जळगाव जिल्ह्याच नव्हे तर जळगाव महापालिकेत नियुक्त करून घेतले आहे. जळगाव नगररचना विभाग बि. जे. मार्केट येथे कार्यरत झाल्याबरोबर आर. एम. पाटील (सहाय्यक संचालक नगररचना) यांचे नागरिकांशी फटकळ बोलणे, विशिष्ट मग्रूरीत राहणे या स्वभावाचा प्रत्यंतर येत आहे.

तरी जळगाव येथे आर. एम. पाटील यांच्या नियुक्तीची सखोल चौकशी करण्यात यावी असे जनहीतार्थ निवेदन छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले असुन त्याची प्रत माहितीसाठी जिल्हाधिकारी जळगाव प्रधान सचिव, (न.वि. 1) नगरविकास विभाग, मुंबई, महाराष्ट्र, संचालक, नगररचना विभाग, पुणे, महाराष्ट्र यांना पाठवली आहे.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
जळगाव

ग्राहकांनी नवीन मीटर बसवावे म्हणून जुन्या मीटर धारकांना दिले जाताय सरासरी बिले

June 2, 2026
गुन्हे

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

June 2, 2026
गुन्हे

खुन्नस देण्याच्या कारणावरुन एकमेकांवर टोकदार वस्तूने हल्ला

June 1, 2026
गुन्हे

गच्चीवर झोपण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

June 1, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : ठेवीदारांची १०० टक्के रक्कम परत मिळण्याचा मार्ग मोकळा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरकुल घोटाळा : अपात्रता प्रकरणी न्यायालयाची पाच नगरसेवकांसह मनपा आयुक्तांना नोटीस !

November 7, 2020

चोपडा नगरपालिकेचा भोंगळ कारभार ; नित्तल पार्क कॉलनीतील रहिवाशी त्रस्त !

August 6, 2023

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शासकीय गोदाम परिसरात वृक्षारोपण !

August 14, 2024

पल्स पोलिओ लसीकरणापासून एकही मुल वंचित राहू नये : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

January 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group