जळगाव (प्रतिनिधी) कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील इंग्रजी विषयाचे पीएच. डी मार्गदर्शक डॉ. अविनाश बडगुजर, यांचे वाड्मय चौर्यबाबत चौकशीची मागणी करण्यात आली होती. तसेच ज्या विद्यार्थ्यांना डॉ. चौधरी मार्गदर्शन करीत आहे. त्या सर्व विद्यार्थ्याचे संशाधन थांबविण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर सचिव ऍड. कुणाल पवार यांनी विद्यापीठ कुलगुरू यांना निवेदन दिले आहे.
याबाबत ऍड. पवार यांनी याआधी विद्यापीठ कुलगुरू यांना भेटून सदर प्रकाराबाबत कळविले होते. मात्र प्रशासनाकडून अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. याप्रकरणात काही चुकीचे घडल्यास आपण सर्वस्वी जबाबदारा राहणार असल्याचा इशारा देखील ऍड. कुणाला पवार यांनी दिला आहे.