सोलापूर (वृत्तसंस्था) घरगुती कार्यक्रमासाठी मंगळवेढ्याकडे दुचाकीवरून निघालेल्या पती-पत्नीला ट्रॅव्हल्स बसने जोराने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पती ठार झाले तर पत्नी गंभीर जखमी झाल्या.
नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील दत्तात्रय कुंडलिक लवटे आणि लताबाई दत्तात्रय लवटे हे पती-पत्नी मंगळवार दि.२ मे रोजी सकाळी साडेसात वाजता दुचाकीवरून (एम. एच. १४. बीजी. ३६३९) मंगळवेढा येथील नातेवाइकांच्या घरी जात होते. त्याचवेळी ट्रॅव्हल्स बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात दत्तात्रय लवटे हे जागीच ठार झाले तर लताबाई ह्या गंभीर झाल्यात. या प्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाण्यात बेफिकीरपणे वाहन चालवल्याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.