जळगाव (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी यांनी पुर्वपरवानगी शिवाय अभ्यागतांना भेटीसाठी सोमवार व गुरुवार हे दिवस निश्चित करण्यात आलेले असून सोमवार व गुरुवारी दुपारी 12 ते 3 या कालावधीत अभ्यागत आपल्या अडचणी, समस्या, तक्रार, निवेदने, गाऱ्हाणे मांडण्यासाठी भेटू शकतात. परंतु येत्या गुरुवारी दि.31 मार्च 2022 रोजी आर्थिक वर्षा अखेर असल्याने, दि.31 मार्च, 2022 रोजी विविध प्रशासकीय लेख्यांचे अद्ययावतीकरण, विविध माहित्यांचे संकलन व वरिष्ठांकडे सादरीकरण इ.कामामध्ये जिल्हाधिकारी हे व्यग्र असल्याने अभ्यागतांच्या भेटी घेऊ शकरणार नाहीत.
तरी अभ्यागतांना आपल्या कामासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घ्यावयाची असल्यास गुरुवार, दि.31 मार्च, 2022 ऐवजी शुक्रवार, दि.01 एप्रिल, 2022 रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत आपल्या लेखी अर्ज, निवेदनांसह भेट घेता येईल, याची नागरिकांनी नोंदे घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.