TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) भुमिकेमुळे जळगाव ग्रामीण, चाळीसगावमध्ये उबाठा गट नाराज !

vijay waghmare by vijay waghmare
July 23, 2024
in चाळीसगाव, जळगाव, पाचोरा, पारोळा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी गटाकडून जिल्ह्यातील सर्व ११ विधानसभा मतदारसंघानिहाय आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकताच घेतला. याबैठकीत जळगाव ग्रामीण मधून माजी मंत्री गुलाबराव देवकर, एरंडोलमधून माजी मंत्री डॉ.सतीष पाटील व मुक्ताईनगर मधून ॲड रोहिणी खडसे यांच्या नावावर एकमत झाले. तसेच चाळीसगाव मतदारसंघातून माजी आमदार राजीव देशमुख व पाचोरा येथून माजी आमदार दिलीप वाघ यांचे नावे पुढे करण्यात आले.

 

READ ALSO

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

राष्ट्रवादीच्या या भुमिकेमुळे महाविकास आघाडीतील स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. यात प्रामुख्याने जळगाव ग्रामीण, चाळीसगाव व पाचोरा या मतदारसंघांचा समावेश आहे. तिन्ही मतदारसंघात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची ताकद जास्त आहे. चाळीसगाव येथे भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात माजी खासदार उन्मेष पाटील यांनी रणशिंग फुंकले आहे. उन्मेष पाटील यांनी उबाठामध्ये प्रवेश घेतल्यानंतर चाळीसगावमध्ये मंगेश चव्हाण विरुध्द उन्मेष पाटील अशीच लढत होणार असल्याचे मानले जात असतांना राष्ट्रवादीतर्फे तेथून राजीव देशमुख यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. यामुळे उन्मेष पाटील समर्थक नाराज झाल्याचे बोलले जात असून ठाकरे गटाला कमकुवत समजले जात असल्याची भावना  कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्यास यामुळे महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण होत त्यांना फटका बसू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तविण्यात येत आहे.

 

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने गुलाबराव देवकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटातर्फे मंत्री गुलाबराव पाटील हे रिंगणात राहतील. यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार देतांना सर्वच विरोधी पक्षांचा कस लागणार आहे. या मतदारसंघात उबाठा गटाचीही ताकद मोठी आहे. यामुळे त्यांना विश्वासात न घेता राष्ट्रवादीने देवकरांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने उबाठा गटामध्ये नाराजीचा सुरु दिसून येत आहे. याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तविण्यात येत आहे.

 

पाचोरा-भडगाव मतदारसंघातून शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या विरोधात उबाठा गटातर्फे वैशाली सुर्यवंशी या तुल्यबळ उमेदवार मानल्या जातात. त्यांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. या मतदारसंघातून भाजपनेते अमोल शिंदे यांनीही निवडणूक लढणारच! अशी भुमिका घेतली आहे. यामुळे ते गतवेळी प्रमाणे भाजपातून बंडखोरी करुन निवडणुकीसाठी उमे राहतील का अन्य कुठल्या पक्षाकडून उभे राहतील ? हा मुख्य प्रश्न आहे. मध्यंतरी ते उन्मेष पाटील यांच्या माध्यमातून उबाठात प्रवेश करतील, अशी चर्चा रंगली होती. आता या मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे दिलीप वाघ यांचे नाव पुढे आहे.

राष्ट्रवादी व उबाठा या दोन्ही गटांची जिल्ह्यात बऱ्यापैकी ताकद आहे व दोन्ही पक्षांकडून इच्छुकांची संख्या देखील जास्त असल्याने. दोन्ही बाजूकडील पक्षश्रेष्ठींचा कस लागणार आहे. मात्र सध्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतलेल्या भुमिकांमुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. स्थानिक पातळीवरील या नाराजी व मानापमान नाट्य कशाप्रकार शमवले जाईल, याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष लागले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

August 21, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
Next Post

माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांची राजकीय दिशा झाली स्पष्ट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

June 29, 2024

तरुणाने महिलेचं कापलं नाक ; मुख्यमंत्र्यांच्या नावे फेसबुक पोस्ट लिहित पीडितेची आत्महत्या

September 8, 2021

कौटुंबिक वादातून मामे सासऱ्याची चाकूने हल्ला करून केली हत्या

September 14, 2025

महाराष्ट्र स्टुडेंट युनिअनच्या साखळी उपोषणाची सांगता ; शिक्षण विभागाने दखल घेऊन काढले परिपत्रक

July 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group