नागपूर (वृत्तसंस्था) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुर मधील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
मनीलॉंडरींग प्रकरणी अनिल देशमुख यांच्या कटोल येथील निवास्थानी ईडीने पुन्हा छापेमारी केली आहे. आज सकाळी ईडीचे चार अधिकारी नागपूरात दाखल झाले होते. त्यानंतर ते देशमुख यांच्या निवसस्थानी कटोल येथे गेले. काही दिवसांपूर्वी देशमुख यांची ४ कोटीपेक्षा अधिकची संपत्ती ईडीने जप्त केली होती. आता पुन्हा ईडीने आपली चौकशी सुरूच ठेवली आहे. नागपूर जिल्ह्याच्या काटोल नरखेड तालुक्यातील वडाळी वडाविहिरा इथे अनिल देशमुख यांची वडिलोपार्जित काही जागा आहे, घरं आहेत, यावर अधिकाऱ्यांनी छापे टाकले असून इथे सर्च मोहीम सुरू आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने देशमुख यांची अंदाजे ४ कोटींची मालमत्ता १६ जुलैला जप्त केली आहे होती. त्यानंतर त्यांनी हा छापा टाकला आहे. याआधी अनिल देशमुख यांना ईडीने तीन समन्स बजावले आहेत. देशमुख यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या विरोधात अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये ‘ईडी’ला आपल्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करण्यापासून रोखावे, असे म्हटले होते.