TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवीपेठ शाखेची “दगडी बँक” विक्री थांबवावी – एकनाथ खडसे यांची मागणी

vijay waghmare by vijay waghmare
September 30, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीपेठ शाखेची ऐतिहासिक “दगडी बँक” म्हणून ओळखली जाणारी इमारत विक्रीस काढण्याच्या हालचालींना विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या संदर्भात त्यांनी बँकेच्या चेअरमन यांना लेखी निवेदन पाठवून विक्रीचा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.

खडसे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, नवीपेठ शाखेची इमारत जुनी झाल्याने तिचा काही भाग वापरात नाही. त्यामुळे १ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या सभेत विषय क्रमांक २४ अंतर्गत ही इमारत विक्रीसंबंधीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. गव्हर्मेंट रजिस्टर्ड व्हॅल्युअर यांच्या अहवालावर आधारित हा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

मात्र, ही इमारत ब्रिटिश काळातील असून दगडात उभारल्यामुळे ती “दगडी बँक” म्हणून प्रसिद्ध आहे. तत्कालीन संचालक मंडळाने १९२७ मध्ये मुख्य बाजारपेठेतील ही वास्तू विकत घेतली होती. जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या भावना या इमारतीशी निगडीत आहेत. शेतकऱ्यांच्या परिश्रमातून व तत्कालीन संचालक मंडळाच्या दूरदृष्टीतून उभारलेला हा वारसा असलेला ठेवा विकण्याचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या भावना दुखावणारा ठरेल, असे खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे या निर्णयाला तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. सध्याच्या आर्थिक स्थितीत जिल्हा बँकेला मालमत्ता विकण्याची कुठलीही आवश्यकता नाही. त्यामुळे या “हेरीटेज बिल्डिंग” विक्रीस आपला ठाम विरोध नोंदवित असून बँकेच्या संचालक मंडळाने हा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी मागणी खडसे यांनी केली आहे.

पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, जेष्ठ बंधु डॉ. बी. जी. खडसे यांच्या निधनामुळे ते १ ऑक्टोबर रोजीच्या संचालक मंडळाच्या सभेस उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे या पत्राद्वारेच आपली भूमिका स्पष्ट करीत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जुलै 2026 !

July 30, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कर्नाटक, बिहार, पंजाब, महाराष्ट्र सेमिफायनलमध्ये

July 11, 2025

आरटीपीसीआर, एंटीजन टेस्ट आणि लसीकरण केंद्र वेगळे करा ; भाजपची मागणी !

April 27, 2021

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ६ जानेवारी २०२५ !

January 6, 2025

शिवसेनेचे मुख्यमंत्री होताच सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रूजू झालेत ?; मनसेचा सवाल

March 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group