TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बिलखेडा येथे 33/11 केव्ही नवीन उपकेंद्राचे भूमीपूजन ; AIIB योजनेतून जळगाव ग्रामीणला 32 कोटींची वीज बळकटीकरणाची गती

vijay waghmare by vijay waghmare
February 13, 2026
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी/धरणगाव प्रतिनिधी – मुख्यमंत्री कृषी सौर योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी व ग्रामीण भागातील वीज पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जळगाव ग्रामीण मतदारसंघात विकासाची गती कायम ठेवून नागरिकांना दर्जेदार सुविधा देणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव तालुक्यातील बिलखेडा येथे 33/11 केव्ही क्षमतेच्या नवीन वीज उपकेंद्राच्या भूमीपूजन प्रसंगी बोलत होते.

शासनाच्या Asian Infrastructure Investment Bank (AIIB) योजनेअंतर्गत जळगाव ग्रामीण मतदारसंघातील वीज वितरण व्यवस्था बळकट करण्यासाठी सुमारे रु. 32 कोटींच्या उपकेंद्र, ट्रान्सफॉर्मर व वीज वाहिन्यांच्या कामांना मंजुरी मिळाल्याने ग्रामीण भागातील वीज पुरवठ्यास मोठा आधार मिळणार आहे. यामुळे शेती, लघुउद्योग तसेच घरगुती ग्राहकांना अखंड व सुरळीत वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील मंजूर कामे

रु. 8.17 कोटी खर्चातून शिरसोली, भोणे-बिलखेडे, जळगाव खुर्द व टाकरखेडा येथे 4 नवीन उपकेंद्रे
रु. 4.20 कोटी निधीतून भादली बु., बोरगाव, चांदसर व सोनवद येथे 4 अतिरिक्त रोहीत्र
रु. 3.67 कोटी खर्चातून 89 ठिकाणी 100/200 केव्हीए नवीन रोहीत्र
रु. 1.35 कोटी निधीतून 43 ठिकाणी रोहीत्र क्षमतावाढ
रु. 1.14 कोटी निधीतून पाळधी उपकेंद्राची क्षमतावाढ
रु. 13.56 कोटी निधीतून 10 ठिकाणी शेतीपंप व गावठाण वीज वाहिनी विलगीकरण

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपकार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील यांनी केले. त्यांनी मंजूर 33/11 केव्ही उपकेंद्र व संबंधित वीज वितरण कामांची माहिती दिली. सूत्रसंचालन युवा सेनेचे भैया मराठे यांनी केले तर आभार बापू भदाणे सर व शाखा प्रमुख गोपाल भदाणे यांनी मानले.

या नवीन उपकेंद्रामुळे बिलखेडा, भोणे, जांभोरे व सार्वे परिसरातील सुमारे 750 शेती ग्राहकांना दिवसा 8 तास वीज तसेच 1,235 घरगुती ग्राहकांना 24 तास वीजपुरवठा उपलब्ध होणार असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रमुख उपस्थिती
वीज वितरणचे कार्यकारी अभियंता निलेश सोनगीरे, इन्फ्राचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पाटील, उपकार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, माजी सभापती प्रेमराज पाटील, मुकुंदराव नन्नवरे, अनिल पाटील, भाजपचे डी. जी. पाटील, सुभाषअण्णा पाटील, माजी जि. प. सदस्य माधुरीताई अत्तरदे, ठेकेदार सुजित पाटील, रा. कॉ. चे ज्ञानेश्वर महाजन, उपसरपंच दिलीप भदाणे, देविदास भदाणे, युवासेनेचे दीपक भदाणे, शाखा प्रमुख गोपाल भदाणे, आखाडू सोनवणे, शेतकी संघाचे गजानन पाटील, समाधान पाटील, रवी चव्हाण सर, विलास महाजन, भानुदास विसावे यांच्यासह परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Farmerdharangaongulabrao patil

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 14 फेब्रुवारी 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोऱ्यात विज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयात कॉंग्रेस धडकली

October 30, 2021

नागपुरात सोलर एक्सप्लोसिव्ह भीषण स्फोट ; नऊ कामगारांचा होरपळून मृत्यू !

December 18, 2023

धक्कादायक : भुसावळात पोलिस चौकी परिसरात एकाचा खून !

May 8, 2021

जळगाव जिल्ह्यात पहिल्या दिवशी ४४३ आरोग्य सेवकांचे लसीकरण

January 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group