भडगाव (प्रतिनिधी) तालूक्यातील गिरड येथील लखवी नाला (धोबी घाट) येथील सिमेंट बांधकामाच्या कामात अपहार केल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांच्याविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, भडगाव तालुक्यातील गिरड येथील ग्रामविकास अधिकारी नारायण शिवराम महाजन व जि प लघुसिंचन उपविभागाचे कनिष्ठ अभियंता एस.बी गायकवाड यांनी संगनमताने गिरड येथील लखवी नाला (धोबी घाट) येथीस सिमेंट बांधकामाच्या कामावर झालेला अकुशल खर्च रक्कम ८,२०,६५८ हा निष्फळ ठरतो तसेच कुशल कामावर झालेला खर्च रक्कम २,६८,२८६ संशयास्पद वाटतो. त्यामध्ये अफरातफर झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणी दिलीप आत्माराम चिंचोरे (वय ५०, रा. शिवकॉलनी, बाळद रोड भडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुरंन ४०/२०२२ भादवि कलम ४०९, ४२०, ३४ प्रमाणे ग्रामविकास अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि दत्तात्रे नलावडे करीत आहेत.