नशिराबाद (प्रतिनिधी) येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात प्रवेशोत्सव कोविड – १९ च्या सर्व नियमाचे पालन करून जल्लोषात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम सर्व विद्यार्थी व पालकांना गेटातून प्रवेश देऊन त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला व त्यांचा जल्लोषात स्वागत करण्यात आले.
त्यानंतर विद्यालयाचे विद्यार्थी कुमार सार्थक जाधव च्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करून कुमारी नव्या माळीच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तद्नंतर सर्व विद्यार्थ्यांना औक्षण करून संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, अध्यक्ष जनार्दन माळी, मुख्याध्यापक सी बी अहिरे, प्रविण महाजन, पर्यवेक्षक बी आर खंडारे, टी टी सोनवणे, राहुल जोशी यांच्या हस्ते गुलाब पुष्प देण्यात येऊन त्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन पूजा पाटील व तुषार रंधे यांनी केले तर त्यांना मुख्याध्यापक प्रविण महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.