नागपूर (वृत्तसंस्था) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे वकील अॅड. सतीश उके (satish uke) यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेही वकीलपत्र त्यांनी घेतले होते. दरम्यान, आता ईडीने अॅड. सतीश उके यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात अनेक केसेस केलेल्या आहे. एका प्रकरणाचा निकाल चार दिवसात लागणार होता. त्याआधीच सतीश यांना उचललं. तसेच यासंबधी पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे, असा गौप्यस्फोट त्यांचे लहान भाऊ शेखर उके यांनी केला आहे.
नागपूरमध्ये आता सतीश उके यांच्या घरावर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने छापा टाकला आहे. पहाटे 5 वाजेच्या सुमारास ईडीचे पथक उकेंच्या घरी पोहोचले. पहाटेपासून त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. सकाळपासून उके यांची चौकशी करण्यात आली होती. जमीन व्यवहार प्रकरणात ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. घरी चौकशी झाल्यानंतर ईडीने उकेंना ताब्यात घेतले आहे.
फडणवीस केसच्या निकालाआधीच धाड – शेखर उके
अॅड सतीश उके आणि प्रदीप उके यांना ईडीने ताब्यात घेतले, अशी माहिती त्यांचे बंधू शेखर उके यांनी दिली. यावेळी शेखर उके यांनी या कारवाईवरून अनेक सवाल उपस्थित केले आहेत. सकाळी 5 वाजता ईडीने छापा टाकला. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात अनेक केसेस केलेल्या आहेक, एका प्रकरणाचा निकाल चार दिवसात लागणार होता. त्यासाठी त्यांनी सतीश उके यांचा लॅपटॉप, मोबाईल जप्त केला आहे. ईडीने कागदपत्र पाहणी केली. लॅपटॉप जप्त केला. त्यामुळे फडणवीस यांच्याविरुद्धच्या केसेस आणि भविष्यातील केसेस तसेच जज लोया केस, निमगडे केस हे सर्व लॅपटॉपमध्ये होते. त्यामुळे हे पुरावे नष्ट केले जातील, असा मोठा गौप्यस्फोट शेखर उके यांनी केल आहे. फडणवीस यांच्याकडून काही लोक आले होते की, तुम्ही आमच्याकडे सामील व्हा, पैशाचे अमिष दाखवले गेले होते. आमच्याकडे असलेले पुरावे ते नष्ट करतील, असा दावा शेखर उके यांनी केला आहे.
‘केंद्रीय यंत्रणा गैरवापर करुन कारवाई’ – नाना पटोले
सतीश उके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निवडणूक याचिकेत बाजू मांडली होती. सतीश उके यांनी अनेक मोठ्या प्रकरणात मोठा युक्तीवाद केला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकरणातही उके हे फडणवीसांविरोधात बाजू मांडत होते. त्यावेळीही सतीश उके बरेच चर्चेत राहिले होते. आज नागपुरातील त्यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. जो व्यक्ती मोदी यांच्या सरकार विरोधात भूमिका मांडेल त्यावर केंद्रीय यंत्रणा गैरवापर करत कारवाई करत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिली आहे. वकील उके यांच्यावर केलेल्या ईडी कारवाईनंतर पटोले यांनी टीका केली आहे.
दरम्यान, सतीश उके हे कट्टर देवेंद्र फडणवीस विरोधक मानले जातात. उके यांनी वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पोलिसात तक्रारी दिल्या होत्या. अनेक प्रकरणांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. एवढंच नाहीतर जस्टिस लोया प्रकरण, निमगडे हत्याकांड, चंद्रशेखर बावनकुळे भ्रष्ट्राचार प्रकरण या संदर्भात त्यांनी वारंवार प्रश्न उपस्थित केले होते. सतीश उके हे जमीन व्यवहार प्रकरणामुळे अडचणीत आले होते, त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप देखील होते. त्यातूनच ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.
काय आहे प्रकरण?
सतीश उके हे पार्वतीनगर भागात राहतात. आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास ईडीने छापा टाकला. सतीश उके आणि त्यांचे भाऊ हे घरीच आहे. काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रांचने उके यांनी जमीन व्यवहाराबाबत नोटीस बजावली होती. या प्रकरणातून छापा टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे. उकेंच्या घरी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नागपूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी संजय राऊत आणि सतीश उके यांची भेट झाली होती. सतीश उके यांनी फोन टॅप प्रकरणात नाना पटोले यांची केस लढवली आहे. फडणवीस यांच्याविरोधात 2014 मध्ये प्रतिज्ञापत्रात दोन खटले लपवल्याचा आरोप करत याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून फडणवीसांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. या प्रकरणामुळे उके आणि भाजप आमनेसामने आले होते.