TheClearNews.Com
Thursday, June 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : फडणवीसांचे कट्टर विरोधक अॅड. सतीश उके यांच्या घरी ईडीचा छापा ; चौकशीसाठी घेतले ताब्यात ! (व्हिडीओ)

'या' कारणासाठी सतीश उके यांना ईडीने उचललं ; भावाने केला मोठा गौप्यस्फोट !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 31, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे वकील अॅड. सतीश उके (satish uke) यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेही वकीलपत्र त्यांनी घेतले होते. दरम्यान, आता ईडीने अॅड. सतीश उके यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात अनेक केसेस केलेल्या आहे. एका प्रकरणाचा निकाल चार दिवसात लागणार होता. त्याआधीच सतीश यांना उचललं. तसेच यासंबधी पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे, असा गौप्यस्फोट त्यांचे लहान भाऊ शेखर उके यांनी केला आहे.

READ ALSO

जळगाव बनावट शालार्थ आयडी प्रकरण: आमदार खडसेंचा सवाल, शासनाचे ठोस कारवाईचे आश्वासन

जून्या वादातून दोन गटांकडून एकमेकांवर विळ्याने वार

नागपूरमध्ये आता सतीश उके यांच्या घरावर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने छापा टाकला आहे. पहाटे 5 वाजेच्या सुमारास ईडीचे पथक उकेंच्या घरी पोहोचले. पहाटेपासून त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. सकाळपासून उके यांची चौकशी करण्यात आली होती. जमीन व्यवहार प्रकरणात ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. घरी चौकशी झाल्यानंतर ईडीने उकेंना ताब्यात घेतले आहे.

फडणवीस केसच्या निकालाआधीच धाड – शेखर उके

अ‍ॅड सतीश उके आणि प्रदीप उके यांना ईडीने ताब्यात घेतले, अशी माहिती त्यांचे बंधू शेखर उके यांनी दिली. यावेळी शेखर उके यांनी या कारवाईवरून अनेक सवाल उपस्थित केले आहेत. सकाळी 5 वाजता ईडीने छापा टाकला. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात अनेक केसेस केलेल्या आहेक, एका प्रकरणाचा निकाल चार दिवसात लागणार होता. त्यासाठी त्यांनी सतीश उके यांचा लॅपटॉप, मोबाईल जप्त केला आहे. ईडीने कागदपत्र पाहणी केली. लॅपटॉप जप्त केला. त्यामुळे फडणवीस यांच्याविरुद्धच्या केसेस आणि भविष्यातील केसेस तसेच जज लोया केस, निमगडे केस हे सर्व लॅपटॉपमध्ये होते. त्यामुळे हे पुरावे नष्ट केले जातील, असा मोठा गौप्यस्फोट शेखर उके यांनी केल आहे. फडणवीस यांच्याकडून काही लोक आले होते की, तुम्ही आमच्याकडे सामील व्हा, पैशाचे अमिष दाखवले गेले होते. आमच्याकडे असलेले पुरावे ते नष्ट करतील, असा दावा शेखर उके यांनी केला आहे.

‘केंद्रीय यंत्रणा गैरवापर करुन कारवाई’ – नाना पटोले

सतीश उके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निवडणूक याचिकेत बाजू मांडली होती. सतीश उके यांनी अनेक मोठ्या प्रकरणात मोठा युक्तीवाद केला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकरणातही उके हे फडणवीसांविरोधात बाजू मांडत होते. त्यावेळीही सतीश उके बरेच चर्चेत राहिले होते. आज नागपुरातील त्यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. जो व्यक्ती मोदी यांच्या सरकार विरोधात भूमिका मांडेल त्यावर केंद्रीय यंत्रणा गैरवापर करत कारवाई करत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिली आहे. वकील उके यांच्यावर केलेल्या ईडी कारवाईनंतर पटोले यांनी टीका केली आहे.

दरम्यान, सतीश उके हे कट्टर देवेंद्र फडणवीस विरोधक मानले जातात. उके यांनी वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पोलिसात तक्रारी दिल्या होत्या. अनेक प्रकरणांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. एवढंच नाहीतर जस्टिस लोया प्रकरण, निमगडे हत्याकांड, चंद्रशेखर बावनकुळे भ्रष्ट्राचार प्रकरण या संदर्भात त्यांनी वारंवार प्रश्न उपस्थित केले होते. सतीश उके हे जमीन व्यवहार प्रकरणामुळे अडचणीत आले होते, त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप देखील होते. त्यातूनच ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.

काय आहे प्रकरण?

सतीश उके हे पार्वतीनगर भागात राहतात. आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास ईडीने छापा टाकला. सतीश उके आणि त्यांचे भाऊ हे घरीच आहे. काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रांचने उके यांनी जमीन व्यवहाराबाबत नोटीस बजावली होती. या प्रकरणातून छापा टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे. उकेंच्या घरी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नागपूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी संजय राऊत आणि सतीश उके यांची भेट झाली होती. सतीश उके यांनी फोन टॅप प्रकरणात नाना पटोले यांची केस लढवली आहे. फडणवीस यांच्याविरोधात 2014 मध्ये प्रतिज्ञापत्रात दोन खटले लपवल्याचा आरोप करत याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून फडणवीसांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. या प्रकरणामुळे उके आणि भाजप आमनेसामने आले होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव बनावट शालार्थ आयडी प्रकरण: आमदार खडसेंचा सवाल, शासनाचे ठोस कारवाईचे आश्वासन

June 25, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोन गटांकडून एकमेकांवर विळ्याने वार

June 25, 2026
गुन्हे

जेईईचे ऑनलाईन क्लास शोधणाऱ्या महिलेला २३ लाखांचा ऑनलाईन गंडा

June 25, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
Next Post

भुसावळ तालुक्यात घरफोडी ; सोन्या चांदीचे दागिने लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात शस्त्रधारी टोळक्याकडून तीन घरांवर हल्ला !

December 28, 2023

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे २० रोजी जळगावात

August 16, 2022

डॉ. आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत जळगाव परिमंडलात २२१ ग्राहकांना वीजजोडणी

October 3, 2021

महाराष्ट्र राज्य लोककलावंत निवड समितीवर विनोद ढगे यांची निवड

August 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group