भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळात तीन लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले.
बाजारपेठ पोलिसांनी बनावट नोटा घेऊन आलेल्या तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीच्या पाचशेच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. हे संशयित जळगाव, भुसावळ व रावेर येथील रहिवाशी आहेत. दरम्यान, या नोटा संशयित आरोपींनी कुठून आणल्या? याआधी किती वेळा त्यांनी बाजारात नकली नोटा विक्री केल्या? तसेच या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार कोण?, हे शोधून काढणे, हे पोलीसा समोरचे मोठे आव्हान आहे.
महामार्गावर पोलिसांच्या पथकाला याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानूसार तीन जण मोटारसायकलने येत असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी त्यांना थांबवत त्यांची विचारपूस केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या जवळ असलेल्या पिशवीची तपासणी केली. त्यात बनावट नोटा आढळून आल्या. पोलिसांनी केलेल्या चौकशीत १) सैय्यद मुशाईद अली मुमताज अली – ३८ रा उस्मानीया पार्क शिवाजी नगर, जळगाव, २) नदीम खान रहीन खान (वय- ३५ रा- सुभाष चौक शनी पेठ शाळा १० नं, जळगाव ३) अब्दुल हमीद अब्दुल कागल (रा, रसलपुर रोड अब्दुल हमीद चौक, रावेर), अशी संशयितांची नावे असल्याचे समोर आले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो उप निरीक्षक राजु विष्णु सांगळे हे करीत आहेत.