TheClearNews.Com
Thursday, September 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 18, 2021
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन 2021-22, 22-23,23-24 या तीन वर्षाकरीता लागू करण्यात आली आहे. या योजनेत जळगाव जिल्ह्यासाठी आंबिया बहाराकरीता केळी, मोसंबी, पपई, आंबा व डाळिंब या फळपिकांसाठी महसूल मंडळस्तर क्षेत्र घटक धरुन अधिसुचित मंडळामध्ये भारतीय कृषि विमा कंपनी लि. मुंबई मार्फत राबविण्यात येणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

जळगाव जिल्ह्यात या योजनेव्दारे आंबिया बहार फळ पीकनिहाय केळी या पिकासाठी कमी तापमान, जादा तापमान, वेगाचा वारा व गारपीट, मोसंबी या फळपिकासाठी अवेळी पाऊस, जादा तापमान, जास्त पाऊस व गारपीट, पपई फळपिकासाठी कमी तापमान, वेगाचा वारा, जास्त पाऊस, सापेक्ष आर्द्रता गारपीट, आंबा फळ पिकासाठी अवेळी पाऊस, कमी तापमान, जादा तापमान, वेगाचा वारा व गारपीट, तर डाळिंब या फळ पिकासाठी अवेळी पाऊस, जादा तापमान, जास्त पाऊस व गारपीट या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण पुरविण्यात येणार आहे.

READ ALSO

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

ही योजना सर्व कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकासाठी ऐच्छिक राहील. अधिसूचित फळ पिकांपैकी एका फळ पिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरीता विमा संरक्षणासाठी अर्ज ( उदा. मोसंबी व डाळिंब) करता येईल. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी न होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित पिकाकरीता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस आधीपर्यंत संबधित बँकेस त्या अनुषंगाने विमा हप्ता कपात न करण्याबाबत कळविणे आवश्यक राहील. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी संबंधित बँकेस कळविणार नाहीत, असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत, असे गृहित धरण्यात येईल. या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पध्दतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.

आंबिया बहार 2021-22 करीता पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेमध्ये सहभागाचे वेळापत्रक, विमा संरक्षित रक्कम, विमा हप्ता रक्कम व योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत अशी : केळी – विमा संरक्षित रक्कम /हेक्टर – 1,40,000/- गारपीट -46,667/-, विमा हप्ता रक्कम – 10500/- 2333/- अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर, 2021, मोसंबी – विमा संरक्षित रक्कम /हेक्टर – 80,000/- गारपीट -26,667/-, विमा हप्ता रक्कम – 4000/- 1333/- अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर, 2021, पपई -विमा संरक्षित रक्कम /हेक्टर – 35,000/- गारपीट -11,667/-, विमा हप्ता रक्कम – 1750/- 583/- अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर, 2021, आंबा -विमा संरक्षित रक्कम /हेक्टर – 1,40,000/- गारपीट -46,667/-, विमा हप्ता रक्कम – 23800/- 2333/- अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर, 2021, डाळिंब- विमा संरक्षित रक्कम /हेक्टर – 1,30,000/- गारपीट -43333/-, विमा हप्ता रक्कम – 28600/- 2167/- अंतिम मुदत 14 जानेवारी, 2021 पर्यंत आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना आंबिया बहाराकरीता अधिसूचित फळपिकांना राबविण्यात येत आहे. फळ पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. ठाकूर यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी नजीकच्या सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बँका, मंडळ कृषी अधिकारी कार्यालय (सर्व), तालुका कृषी अधिकारी कार्यालय (सर्व तालुके), उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, जळगाव/पाचोरा/अमळनेर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जळगाव, ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मुंबई, क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्सचेंज टॉवर्स, 20 वा माळा, दलाल स्ट्रीट फोर्ट, मुंबई – 400023, टोल फ्री नंबर-1800 419 5004, ई – मेल pikvima@aicofindia.com. जिल्हा प्रतिनिधी, ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि. मो. क्र. 9595554473 यांच्याशी संपर्क साधावा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
जळगाव

भाजपा उत्तर महाराष्ट्र ‘विभागीय कार्यालय प्रमुख’ पदी शिवम शिंपी यांची निवड; निष्ठावान, अभ्यासू आणि मनमिळाऊ कार्यकर्त्याचा सन्मान

September 2, 2026
क्रीडा

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

September 2, 2026
गुन्हे

कारखान्यांमध्ये ४७ लाखांची वीजचोरी; दोन प्रकरणांत तिघांवर गुन्हा दाखल

September 1, 2026
गुन्हे

महिलेच्या घरातून लाखो रुपयांचा ऐवज लांबविणारे दोघे चोरटे भावंड गजाआड

September 1, 2026
Next Post

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत रब्बी हंगामासाठी अनुदानावर होणार प्रमाणित बियाणांचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत शेतकऱ्यांना नोंदणी करण्यास १० सप्टेंबरपर्यंत मुदत

August 27, 2021

पुढची चार वर्षं कशी जातील ते भाजपला कळणार नाही; जयंत पाटील

November 16, 2020

हद्दपारीचे उल्लंघन करणाऱ्या संशयितावर एमआयडीसी पोलीसांची कारवाई !

July 22, 2024

मोदींच्या मनात नसेलही, मग कुणी झारीतले राजकीय शुक्राचार्य आहेत का? ; संजय राऊतांचा सवाल

April 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group