TheClearNews.Com
Tuesday, July 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

आत्मा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न

vijay waghmare by vijay waghmare
February 21, 2025
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) दि. २१  – ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शेतकऱ्यांना मजूर टंचाईच्या समस्येवर तोडगा काढता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्मा अंतर्गत शेतकरी गट स्थापन करून ड्रोनच्या मदतीने फवारणी तंत्रज्ञानाचा लाभ घेवून अनुदानासाठी अर्ज करावा, आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसह शेतीतील विविध अडचणींवर मात करता येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळावे व आधुनिक कृषी साधनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.पिंपळे खुर्द येथे आत्मा (ATMA) अंतर्गत जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

या कार्यक्रमात आत्मा समितीचे अध्यक्ष प्रमोद पाटील, आत्मा जळगावचे प्रकल्प संचालक कुरबान तडवी, उपविभागीय कृषी अधिकारी (अमळनेर) चंद्रशेखर साठे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. हेमंत बाहेती, वैभव सुर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी किरण देसले, मंडळ कृषी अधिकारी अरुण कोळी तसेच तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहाय्यक उपस्थित होते. गावचे सरपंच कैलास पाटील, उमेदचे नारायण महाजन, कांचन पाटील, सुदर्शन पाटील, मोती आप्पा, गोपीचंद पाटील, रविंद्र पाटील, गोपीचंद पाटील, रवींद्र पाटील, मनोज पाटील, बंडू पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
पालकमंत्र्यांचा झाला नागरी सत्कार

READ ALSO

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

ग्रामपंचायत कार्यलयात मंत्री गुलाबराव पाटील यांचा ग्रामस्थांनी व ग्रा.पं. मार्फत शाल श्रीफळ व गुलाबाचा हार घालून भव्य नागरी सत्कार केला. प्रसंगी त्यांनी सांगितले की, गावाचे प्रेम व सत्कार सदैव स्मरणात राहील व गावासाठी निधीची निकड भासू देणार नाही. यावेळी सरपंच सौ. सुनंदा पाटील, उपसरपंच किरण पाटील, मार्केटचे माजी सभापती प्रमोद पाटील, शाखा प्रमुख ललित पाटील, कैलास पाटील ग्रा.पं. सदस्य विनोद पाटील, जगदीश पाटील, मानसी पाटील, सुनंदा पाटील, यशंवत श्रीवंत, राजू मोरे, समाधान पाटील आदी उपस्थित होते.

शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात आत्मा प्रकल्प संचालक कुरबान तडवी यांनी ॲग्री स्टेक शेतकरी नोंदणीबाबत मार्गदर्शन केले. रब्बी हंगामातील पिकांवरील कीड व रोग संरक्षणाविषयी डॉ. हेमंत बाहेती यांनी माहिती दिली. शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध कृषी यंत्रांची देखभाल आणि दुरुस्ती कशी करावी, यासंदर्भात वैभव सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. तसेच ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे फवारणीचे महत्त्व आणि त्याचा उपयोग याविषयी यश वाघ यांनी सखोल माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्मा बीटीएम दीपक नागपुरे यांनी केले. त्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी किरण देसले यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी ड्रोनद्वारे फवारणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी सहाय्यक विमल सुरावार, गजानन मोरे, राहुल पवार, पद्माकर पाटील, तृषिकेश रेड्डी, अक्षय पाटील, नितीन पाटील, ललित पाटील, रविंद्र पाटील यांनी मेहनत घेतली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
गुन्हे

शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून व्यापाऱ्याला सव्वानऊ लाखांचा गंडा

July 13, 2026
गुन्हे

हातचालाखी करीत एटीएम कार्ड बदलावून ग्रामसेवकाला ८० हजारात गंडविले

July 12, 2026
धरणगाव

समाजकार्याचा आदर्श – अनाथ मुलीसाठी जयहर्ष फाऊंडेशनची 5 हजार रुपयांची मदत…!

July 11, 2026
Next Post

खंडणीसाठी धमकावून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकावर हल्ला करण्याचा प्रयत्न; आरोपीला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold Price Today : सोन्याची किंमत वाढली ; जाणून घ्या.. आजचा दर !

January 24, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 29 जून ते 5 जुलै 2025 !

June 29, 2025

संतापजनक : अत्याचारातून अल्पवयीन तरुणी गर्भवती ; संशयित आरोपी अटकेत !

May 30, 2023

मनियार बिरादरीने पोलीस अधीक्षक डॉ. मुंडे यांचा केला गौरव

January 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group