धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील निशाने फाट्यावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी पंचायत समितीचे सभापती मुकुंदभाऊ नन्नवरे यांनी सार्वजनिक बांधकाम उपअभियंता यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर, पंचायत समितीच्या बैठकीत रस्ते दुरुस्तीबाबत दिशाभूल करणारी आणि खोटी माहिती दिल्याचा आरोप देखील नन्नवरे यांनी केला आहे.
मुकुंद नन्नवरे यांनी आज सार्वजनिक बांधकाम उपअभियंता यांना एक पत्र दिला आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, पंचायत समितीच्या मासिक सभेत आढावा सादर करतेवेळी तालुक्यातील रस्ते खराब होऊन मोठे खड्डे पडले असून ते तात्काळ सुजण्यावर देण्यात येणार आहेत. तसेच साईट पट्ट्यांवर झाडेझुडपे तोडण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचित करण्यात आले होते. विशेषतः चोपडा या रस्त्याबाबत गांभीर्याने घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. जेणेकरून अपघात होणार नाही. परंतु ११ नोव्हेंबर २०२० रोजीच्या पंचायत समितीच्या मासिक सभेत सार्वजनिक बांधकाम उपअभियंता यांनी दिलेला अहवाल चुकीचा होता. कारण याच रस्त्यावर आज गड्डे चुकवित असताना तीन नागरिक ठार झाले आहेत. वरील घटनाक्रम पाहता आपण ११ नोव्हेंबर रोजी दिलेला अहवाल खोटा व दिशाभूल करणारा होता. चोपडा रस्त्यावर कुठलेही खड्डे बुजविण्यात आल्याचे प्रत्यक्ष भेटीत दिसून आले नाही. त्यामुळे आपण पंचायत समितीच्या सभागृहाचा अवमान केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण वेळेत खड्डे बुजविले नाहीत. यामुळे अपघात होऊन तीन निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेला असून त्याचा पण व्यक्तीचा जबाबदार आहात. त्यामुळे आपल्यावर खोटा व दिशाभूल करणारा आढावा पंचायत समिती सभागृहात सादर केला. तसेच आपल्या हलगर्जीपणामुळे ती निष्पाप नागरिकांचा बळी गेला म्हणून आपणावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येऊ नये?, याबाबत आपण आपला लेखी खुलासा इकडील कार्यालयात समक्ष येऊन सादर कराव्या, अशा सूचना पंचायत समिती सभापती मुकुंद नन्नवरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपयोग केल्या आहेत.