धरणगाव (प्रतिनिधी) येथील पालिकेचे कर्मचारी रावा मांगो माळी यांच्या वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. या मदतीसाठी श्री. माळी यांच्या परिवाराने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.
बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे श्रीकांत शिंदे फाउंडेशन व मुख्यमंत्री सहायता निधीमधून धरणगाव नगरपालिकेचे माजी कर्मचारी रावा मांगो माळी यांच्या वैद्यकीय उपचारासाठी एक लाख रुपयाची आर्थिक मदत आज करण्यात आली. यासाठी नामदार गुलाबराव पाटील व जि.प. सदस्य प्रतापभाऊ पाटील यांचे सहकार्य लाभले. माळी परिवाराकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,नामदार गुलाबरावजी पाटील, मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांचे आभार मानले आहे. तर मदत मिळण्यासाठी कागदपत्राचा पाठपुरावा करण्यात माजी गटनेते पप्पू भावे, माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, वाल्मिक पाटील, वासुदेव चौधरी, विलास महाजन, पवन महाजन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मदत केली.