TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आधी घेतला राजकारणातून संन्यास, नंतर भाजपला पाठिंबा ; सुरेशदादा जैन यांच्या भूमिकेमुळे जळगावच्या राजकारणात ट्विस्ट !

vijay waghmare by vijay waghmare
May 11, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा राजीनामा देत राजकारणातून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यांनी भाजपाला आपला पाठिंबा जाहीर केला व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना त्यांनी भाजपला मतदान करावे असे आवाहन केले आहे. एवढेच नव्हे तर, कोणी काहीही आरोप करत असले तरी माझ्यावर कुणाचा दबाव नसल्याचेही सुरेशदादांनी स्पष्ट केले आहे.

सुरेशदादांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात नेमकं काय म्हटलंय !

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

प्रिय जळगाव जिल्हावासियांनो,
खान्देश माझी जन्मभूमी व जळगाव माझी कर्मभूमि राहिलेली आहे. सर्व जळगावकरांना मी माझ्या परिवाराचा सदस्य म्हणून मानतो. मी नेहमी जळगावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिलो आहे. विकासाशिवाय पर्याय नाही. मग तो भारतदेशाचा, राज्याचा, जिल्ह्याचा किवा जळगावचा असो. विकासामुळे देशात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगतीच्या कक्षा रुंदावतात त्यात शिक्षण, आरोग्य, कृषी, पायाभूत सुविधा (रेल्वे, रस्ते, विमान सेवा, पिण्याचे पाणी, घरकुल इ.), याच कडीत भारत देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी उद्योगाची साखळी निर्माण करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात अशा अनेक गोष्टीमुळे सकारात्मक बदल घडून भारत जगाच्या पाठीवर एक वेगळं स्थान निर्माण करेल ही शाश्वती आहे.
मी १९७८-१९८० ला राजकारणात आल्यावर विकासाच व्हिजीन ठेवून जळगावला स्वच्छ-सुंदर-साक्षर व हिरवेगार शहर बनवायचे ध्येय ठेवले होते व तसे कार्य ही केले त्यामुळे जळगाव शहराच्या विकासासोबत जिल्ह्याच्या, राज्याच्या व देशाच्याही विकासाला हातभार लावता आला.
मी २०१४ पासून राजकारणात सक्रीय नाही. वयोमानानुसार आणि तब्येतीच्या दृष्टीने आता राजकीय रणांगणात उतरायची इच्छा ही नाही. पण समाजकारण माझ्या रक्तातच आहे. गेल्या ४५ वर्षाचा विकासाचा आणि त्यासाठी केलेल्या कामांचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. राजकीय जीवनात विकासासाठीच मी वेगवेगळ्या पक्षामध्ये राहिलो आणि आपण मला भरभरून आशिर्वादही दिले. नवीन विकसीत भारतात जळगाव जिल्ह्याला मानाचे स्थान मिळावे म्हणूनच या पुढे मार्गदर्शकाच्या भूमिकेत जळगाव शहर, जिल्हा, राज्य व देशाच्या विकासात हातभार लावण्यासाठी मी नेहमीच कटीबद्ध राहील. तोच धागा पकडून ज्या पक्षात विकासाचं व्हिजन आहे, नियोजन आहे, आणि त्यापक्षाचे नेतृत्व विकसीत भारताचे व्हिजन ठेवून कार्य करीत असेल, अशा पक्षाला आणि नेतृत्वाला माझा नेहमीच पाठिबा राहील.
सन्माननीय मोदीजीच्या स्वप्नातील विकसीत भारत घडावा व मी पाहिलेले विकसीत जळगाव जिल्ह्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांच्या नेतृत्वाला पर्यायाने भारतीय जनता पक्षाला मी जाहीर समर्थन देत आहे. माझ्या राजकीय आयुष्यात तुम्ही आजावर जे प्रेम दिलं त्या प्रेमाला मी कायम उतराई होण्याचा प्रयत्न करेल. पक्ष, धर्म, जात-पात या पलीकडे आपण सर्व कायम माझ्या सोबत राहिलात.
माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व जळगाव जिल्हावासियांना माझी आग्रहाची विनंती आपण आपल्या जळगाव जिल्हाच्या विकासासाठी आपले बहुमुल्य मत जळगाव मतदार संघाच्या उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर मतदार संघाच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या कमळ या चिन्हाला देऊन सन्माननीय मोदीजींचे विकसीत भारत घडविण्यासाठी हात बळकट करुया.

सुरेश भिकमचंद जैन
जळगाव, दि. ११ मे २०२४

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #BJP#jalgaonSuresh Dada jain

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
Next Post

मोदीजींच्या विकासाच्या ट्रेनमध्ये सर्वांना जागा : आमदार मंगेशदादा चव्हाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोरखेडा येथे दोन गटात हाणामारी ; धरणगाव पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल !

April 20, 2023

Today’s horoscope : आजचे राशिभविष्य 26 मे 2025 !

May 26, 2025

कोरोनामुळे देशात ४० लाख लोकांचा मृत्यू ; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

April 17, 2022

पॉलिशच्या बहाण्याने लांबविले सव्वा लाखाचे दागिने ; जळगाव पोलिसात अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा !

July 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group